AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांचा जीव भांड्यात, अत्यवस्थ महिलाही ‘कोरोना’मुक्त, दोघींना डिस्चार्ज मिळणार

पुण्यातील खाजगी रुग्णालयातील महिला अत्यवस्थ होती, मात्र उपचारानंतर तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दोन्ही कोरोनामुक्त महिलांना आज डिस्चार्ज दिला जाणार आहे. (Pune Corona Patient Women to get Discharge)

पुणेकरांचा जीव भांड्यात, अत्यवस्थ महिलाही 'कोरोना'मुक्त, दोघींना डिस्चार्ज मिळणार
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 01, 2020 | 8:02 AM
Share

पुणे : पुण्यातील पहिल्या ‘कोरोना’ रुग्णाच्या मृत्यूनंतर पुणेकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील दोन कोरोनाग्रस्त महिला ‘कोरोना’मुक्त झाल्या आहेत. महिलांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. (Pune Corona Patient Women to get Discharge)

एक महिला नायडू रुग्णालयात, तर दुसरी खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती. खाजगी रुग्णालयातील महिला अत्यवस्थ होती, मात्र उपचारानंतर तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दोन्ही कोरोनामुक्त महिलांना आज (बुधवार 1 एप्रिल) डिस्चार्ज दिला जाणार आहे.

डिस्चार्ज दिल्यानंतर दोन्ही महिलांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन ठेवलं जाणार आहे. पुण्यात आतापर्यंत नऊ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा 30 मार्चला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या रुग्णावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात पहिला बळी गेल्यानंतर पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली होती.

हे वाचलंत का?: मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करणार, पुणे पोलिसांचा इशारा

पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे 36 रुग्ण होते, त्यातील 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड परिसरातही 11 मार्चपासून तब्बल 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील 9 जण उपचारानंतर घरी परतले आहेत. (Pune Corona Patient Women to get Discharge)

हेही वाचा: यकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण

पुण्याच्या नायडू रुग्णालयातून बुधवार 25 मार्चला पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त ठरलेल्या पुण्याच्या दाम्पत्याला सकाळी डिस्चार्ज मिळाला होता. तर त्याच रात्री या दाम्पत्याची मुलगी, कुटुंबाला मुंबईहून पुण्याला नेणारा टॅक्सीचा चालक आणि त्यांचा आणखी एक सहप्रवासी यांना घरी पाठवण्यात आले होते.

(Pune Corona Patient Women to get Discharge)

Follow Us
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते... निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे न
Sunetra Pawar | निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे निर्देश; 26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते...
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानं
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानंतर...
ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! रायगडमध्ये ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत तब्बल 2000...
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी...
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी ...
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...
मोठा दिलासा! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश