AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan: ‘नाचता येईना, अंगण वाकडे’, SIR वरून राज ठाकरेंसह विरोधकांवर गिरीश महाजन यांचा निशाणा, म्हणाले…

Girish Mahajan targets the opposition: सध्या देशात केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. SIR प्रक्रियेवरून शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्याचवेळी मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना असे सुनावले आहे.

Girish Mahajan: 'नाचता येईना, अंगण वाकडे', SIR वरून राज ठाकरेंसह विरोधकांवर गिरीश महाजन यांचा निशाणा, म्हणाले...
गिरीश महाजन, राज ठाकरे, ज्ञानेश कुमारImage Credit source: टीव्ही ९मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 8:50 AM
Share

किशोर पाटील, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : SIR प्रक्रियेवरून पुन्हा एकदा काहूर उठलं आहे. ही प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यातच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवर इतर दोन आयुक्तांनी आक्षेप नोंदवल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एसआयआर प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. काही राज्यातील निवडणुका रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. या सर्व गदारोळात महायुतीचे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

नाचता येईना, अंगण वाकडे

राज ठाकरे यांच्या संदर्भात काय बोलावे, हेच आता मला कळत नाही. SIR च्या माध्यमातून डुप्लिकेट असलेली नावे कमी होत आहेत. अजूनही सर्वांना संधी आहे. अर्ज करा, फॉर्म भरा. मात्र, ते कोणाच्या आधारावर आक्षेप घेत आहेत? लोक त्यांना निवडून देत नाहीत आणि त्यांच्या पाठीशी लोकांचा आधार नाही, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली.

काँग्रेस असो, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो, हे सगळे काही ना काही वक्तव्य करत असतात. त्यांची परिस्थिती म्हणजे ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी झाली आहे. बोगस मतांच्या आधारे आपण निवडून येऊ, असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. तुम्हाला शंका असेल तर पुन्हा फॉर्म भरा, असा टोलाही त्यांनी लगावला.

दिवाळीनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट?

मंत्रिमंडळात खांदेपालट होणार असेल, तर त्याबाबत आमदार बच्चू कडू यांना माहिती असेल. मला मंत्रिमंडळातील खांदेपालटाबाबत सध्या कोणतीही माहिती नाही, असा चिमटा गिरीश महाजन यांनी काढला. बियाणे महाग, डिझेल महाग झाले आहे. पण शेतमालाला भाव नाही, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते. आमदार बच्चू कडू हे सत्ताधारी पक्षात आहेत. हे त्यांना का कळत नाही? काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. त्यांनी हा विषय सरकारसमोर मांडला पाहिजे. तुम्ही सरकारमध्ये आहात, त्यामुळे प्रतिक्रिया देऊन सत्तेत नसल्यासारखे वागण्याची गरज नाही, असा टोलाही मंत्री महाजन यांनी कडू यांना लगावला.

आमदार किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळणार?

आमदार किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळावे, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचे आणि कुणाला घ्यायचे नाही, हा त्यांच्या पक्षांतर्गत निर्णयाचा विषय आहे. त्याबाबत मी काही सांगू शकत नाही. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे महाजन म्हणाले.

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती; सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी

आगामी काळात राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. यंदा राज्यात पाऊस जवळपास एक महिना उशिरा आला. पेरणीनंतरही अनेक भागांत पावसाने मोठी दडी मारल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची तसेच चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत शासनाकडून सर्व आवश्यक व्यवस्था केली जाईल. शेतकर्‍यांनी कोणतीही काळजी करू नये. शासन आणि आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आलेल्या नैसर्गिक संकटाचा आपण सर्वांनी मिळून सामना करायचा आहे. गणरायाला माझी विनंती आहे की, नवरात्रोत्सवाच्या काळात चांगला पाऊस पडू दे. नदी-नाले आणि धरणे भरू देत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू दे आणि शेतकऱ्यांचा आगामी रब्बी हंगाम चांगला जाऊ दे. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंचनामे सुरू झाले आहेत. अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करत आहेत. पंचनामे पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही केली जाईल, अशी गिरीश महाजन यांनी माहिती दिली.

Follow Us
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी