पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर खुलं करण्यापूर्वी सॅनिटाईज, तीन टप्प्यात मंदिर उघडणार

ण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर हे तीन टप्प्यात सुरु केले जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. (Pune famous Dagdusheth Ganpati temple Started in Three Phase)

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर खुलं करण्यापूर्वी सॅनिटाईज, तीन टप्प्यात मंदिर उघडणार
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 10:13 AM

पुणे : राज्य सरकारने मंदिरं खुली करण्यास परवानगी दिल्यानतंर येत्या सोमवारपासून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर नागरिकांसाठी खुले होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरात ठिकठिकाणी साफसफाई केली जात आहे. तसेच संपूर्ण मंदिर परिसर सॅनिटाईज केला जात आहे. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर हे तीन टप्प्यात सुरु केले जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. (Pune famous Dagdusheth Ganpati temple Started in Three Phase)

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिर हे तीन टप्प्यात खुले केले जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात फक्त दर्शन दिले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रसाद वाटप होईल. त्यानंतरच्या तिसऱ्या टप्प्यात अभिषेक आणि पूजा करण्यास परवानगी दिली जाईल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान उद्यापासून श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर भाविकांसाठी खुले होणार असल्याने मंदिरात आज सर्वत्र साफसफाई केली जात आहे. मंदिराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे. त्याशिवाय बॉम्ब शोधक आणि बॉम्बनाशक पथकाने मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच मंदिर परिसरात श्वान फिरवण्यात आले आहे.

शिर्डीतील साई मंदिरात 6 हजार भाविकांना दर्शन

शिर्डीतील साईमंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन ठेवलेले आहे; त्यांनीच शिर्डीत यावे असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे. (Pune famous Dagdusheth Ganpati temple Started in Three Phase)

साईदर्शनासाठी यायचे असेल तर, त्यासाठी भाविकांना आगाऊ ऑनलाईन बुकिंग करावे लागेल. तसेच ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलेले असेल त्यांनीच शिर्डीत यावे, कोरोना प्रतिबंधंक सर्व नियम पाळावेत, असे आवाहन साईबाबा संस्थेने केले आहे.

मंदिर प्रवेशासाठी ‘हे’ नियम सक्तीचे

येत्या सोमवारी (16 नोव्हेंबर) पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र प्रार्थनास्थळ खुली केल्यानंतर भाविकांना काही नियमावली पाळणे गरजेचे असणार आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

प्रार्थनास्थळे खुली केल्यानंतर सर्वांना नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा आणि स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका, असे काही नियम यात नमूद करण्यात आले आहे. (Pune famous Dagdusheth Ganpati temple Started in Three Phase)

संबंधित बातम्या : 

ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश

शिर्डीतील साई मंदिरात सोमवारपासून 6 हजार भाविकांना दर्शनाची सोय; पण ऑनलाईन बुकिंग सक्तीची!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.