मंदिरं नसलेल्या गणेश मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी द्या, पुण्यातील गणेशोत्सव समितीची मागणी

पुण्यातील गणेश मंडळांनी मंदिरं नसलेल्या मंडळांना गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली (Pune Ganpati Mandal demand mandap permission).

मंदिरं नसलेल्या गणेश मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी द्या, पुण्यातील गणेशोत्सव समितीची मागणी
Follow us
| Updated on: Aug 14, 2020 | 8:45 AM

पुणे : दरवर्षी उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचं सावट आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवावर अनेक निर्बंध आहेत. मात्र, आता पुण्यातील गणेश मंडळांनी मंदिरं नसलेल्या मंडळांना गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे (Pune Ganpati Mandal demand mandap permission). पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या वतीने शुक्रवार पेठेतील लाड सुवर्णकार धर्मशाळेत गुरुवारी (13 ऑगस्ट) बैठक झाली. यात ही सामूहिक मागणी करण्यात आली.

“गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असला तरी तो मंदिरात करणं शक्य नाही. मंदिरांमध्ये एक मूर्ती असताना आणखी एका मूर्तीची प्रतिष्ठापना करणे योग्य नाही. सजावट केली जाणार नाही. अभिषेक, पूजा, आरती असे धार्मिक विधी भाविकांना केवळ ऑनलाइन पद्धतीने पाहता येतील. उत्सव मंदिरात केला, तर बंदिस्त जागेत गर्दी होण्याचा धोका आहे. उत्सव बंदिस्त जागेऐवजी खुल्या जागेत करणे सुरक्षित आहे, अशी भूमिका या बैठकीत गणेश मंडळांनी मांडली.

दरम्यान, यावर्षी पदपथांवर अथवा रस्त्यांच्या कडेला गणेश मूर्तीच्या विक्री करीता उभारण्यात आलेल्या सर्व अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्याचे आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. या सर्व गणेशमूर्ती विक्रेत्या स्टॉलधारकांना परिसरातील महापालिकेच्या शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्या गणेश मूर्ती विक्रीसाठी मोफत उपलब्ध करून देण्याबाबतही मोहोळ यांनी सूचित केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद तयार करण्यात येणार आहेत. तसेच मूर्तीदान करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयानुसार व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे. त्या नागरिकांसाठी या फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था केली जाणार आहे. त्याशिवाय मूर्ती लवकर विरघळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीनाचं प्राधान्य द्यावे, असंही आवाहन मोहोळ यांनी केलंय. दरम्यान यापूर्वीच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरीचे करावे, असं आवाहन मोहोळ यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या :

पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद, मूर्तीदानाचीही व्यवस्था

पदपथावर गणेश मूर्तीचे स्टॉल नको, पुणे महापौरांचा कारवाईचा इशारा

‘महापौर साहेब इंग्रज होऊ नका, गणेश विसर्जन घाटावरच करणार’, पुण्यात मनसे आक्रमक

“घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करावे”, पुणे महापौरांचे आवाहन

Pune Ganpati Mandal demand mandap permission

Non Stop LIVE Update
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.