'महापौर साहेब इंग्रज होऊ नका, गणेश विसर्जन घाटावरच करणार', पुण्यात मनसे आक्रमक

महापौर साहेब इंग्रज होऊ नका, असं म्हणत मनसेने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सडकून टीका केली आहे (Pune MNS oppose Ganeshotsav restriction).

'महापौर साहेब इंग्रज होऊ नका, गणेश विसर्जन घाटावरच करणार', पुण्यात मनसे आक्रमक

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गणेशोत्सवावर अनेक निर्बंध लावले आहेत. यानुसार गणेश विसर्जन सार्वजनिक स्थळांवर करण्यास बंदी असणार आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला विरोध केला आहे. महापौर साहेब इंग्रज होऊ नका, असं म्हणत मनसेने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सडकून टीका केली आहे (Pune MNS oppose Ganeshotsav restriction).

मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी महापौरांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे, “कोरोनाचं संकट जगावर आहे तसंच देशावर आणि महाराष्ट्रावरही आहे. पण महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात हा कोरोना केवळ देवदेवतांच्या मागे लागला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल परवा आपण पुणेकरांना गणपतीमूर्तीच्या साईज ठरवून देत गणेश मूर्ती घरातच विसर्जित करायचं बंधन घातलं. मात्र, इंग्रजांच्या काळातही अशी बंधनं घालण्यात येत नव्हती.”

“पुण्यामध्ये 1897 मध्ये प्लेगची साथ होती. त्यावेळी प्लेगच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहिम उघडली. या मोहिमेत इंग्रज देव्हाऱ्यापर्यंत पोहचले. त्यामुळे इंग्रजांविरुद्ध असंतोष पसरला आणि रँडचा वध करण्यात आला. आपण इंग्रज नाही आणि पुण्यातील तत्कालीन परिस्थिती देखील प्लेगसारखी नाही,” असंही या निवेदनात म्हटलं आहे.

“हिंदूंच्या धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण?”

अजय शिंदे म्हणाले, “बालाजीपासून ओंकारेश्वरपर्यंत सगळी मंदिरं उघडली. तुम्ही सगळे मॉल उघडले, गर्दीची ठिकाणं सुरु केली. मद्यप्रेमींसाठी राज्य सरकारच्या कृपेने अगदी पोलीस बंदोबस्तात वाईन शॉप सुरु केले. मटणाच्या दुकानाबाहेर चार चार किलोमीटर रांगा लागल्या. आजही सर्व सुरु असून रस्त्यावर गर्दी आहे. मग देवांनाच बंधनं का? आधी देवळं बंद केली आता हिंदूच्या घरात घुसणार का?”

हेही वाचा :

मंत्रिमंडळ बैठकीतील 7 मोठे निर्णय, लवकरच मराठा मोर्चातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख आणि नोकरी

एसटी सेवा, सार्वजनिक बससेवा सुरु करा, वंचितचं राज्यभर ‘डफली बजाव’ आंदोलन

शरद पवार म्हणाले, तो इमॅच्युर, आता पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया…..

Pune MNS oppose Ganeshotsav restriction

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *