पावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं

पुण्यात आता पाऊस थांबला आहे. मात्र या पावासाची दाहकता दाखवणारी दृश्ये आता समोर येत आहेत.

पावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं

पुणे : राज्यभरात तुफान हाहाकार उडवल्यानंतर आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पुण्यातही रात्री पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले. पुण्याला काल संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले. पुण्यात आता पाऊस थांबला आहे. मात्र या पावासाची दाहकता दाखवणारी दृश्ये आता समोर येत आहेत. (pune news Heavy rains slashesh pune water logged at many places)

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोथरुडमध्ये नुकसानीची पाहणी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कात्रज भागात जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. पुण्यात कर्वेरोडवरच्या नेहरु वस्तीमधील काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आता वस्तीमधलं पाणी ओसरलं आहे. पण प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.

याशिवाय काही कोव्हिड सेंटरमध्येदेखील पाणी शिरल्याने प्रशासनासह रुग्णांचीही तारांबळ उडाली. तिकडे सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. रस्त्यावर इतकं पाणी साचलं होतं की त्यामुळे अनेक वाहने जागच्या जागी बंद पडली. जिकडे तिकडे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं. (Heavy rains slashesh pune water logged at many places)

हॉस्पिटलमधील एक्सरे मशीन, सोनाग्राफी मशीन खराब
सिंहगड रोड परिसरातील पाटील हॉस्पिटलमध्ये पाणी घुसलं. हॉस्पिटलच्या तळमजल्यावर सर्वत्र पाणी आणि चिखल पसरला. हॉस्पिटलमधील एक्सरे मशीन, सोनाग्राफी मशीन खराब झाल्या आहेत. तर खालच्या मजल्यावरील सर्व रुग्णांना वरच्या मजल्यावर हलवण्यात आले.

(pune news Heavy rains slashesh pune water logged at many places)

दरम्यान, आंबील ओढा परिसरात पुणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमनदलाची पथकं तैनात करण्यात आली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ओढ्याच्या लगत असणाऱ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये आणि काही घरांमध्ये पाणी शिरलेले होते. पुण्यातला कालचा पाऊस हा गेल्यावर्षी झालेल्या तुफान पावसाची आठवण करुन देणारा ठरला.

तिकडे चंदननगर पोलीस स्टेशनमध्येही पाणी शिरलं. दांडेकर पुलालगत सर्व्हे नंबर 133 मधील काही नागरिकांना साने गुरुजी शाळा आणि मनपा कॉलनी शाळा या दोन्ही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. (Heavy rains slashesh pune water logged at many places)

महापौरांकडून नुकसानीची पाहणी
महापौर मुरलीधर मोहोळ हे आज सकाळपासूनच नुकसानग्रस्त परिसरात पाहणी करत आहेत. कोथरुड परिसरात त्यांनी पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला सूचना दिल्या. पुण्यात काल केवळ 4 तासात 97 मिमी पाऊस झाला असल्याची माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

ओढ्यातून दुचाकी वाहून गेली
दौंड तालुक्यातील राजेगावच्या ओढ्यात दोन दुचाकीवरुन जाणारे 4 जण वाहून गेले. यातील तिघांचे मृतदेह सापडले असून, एकाचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

इतर बातम्या –

दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्रेते-फेरीवाल्यांकडून हप्तावसुली
पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत 36 लाखांनी वाढ; अमित शहांना शेअर बाजाराचा फटका

(pune news Heavy rains slashesh pune water logged at many places)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *