हेडफोन उचलताना तोल गेला, पुण्यात 250 फूट दरीत पडून युवकाचा अंत

हार्दिक माळीच्या हेडफोन उचलण्यासाठी कसरत करत होता, या प्रयत्नात तोल जाऊन वरण तळ्याच्या मागील बुरुजावरुन तो तब्बल 250 फूट खाली पडला.

हेडफोन उचलताना तोल गेला, पुण्यात 250 फूट दरीत पडून युवकाचा अंत
Follow us
| Updated on: Dec 19, 2019 | 8:42 AM

पुणे : हेडफोन उचलताना तोल जाऊन पुण्यातील तिकोणा किल्ल्यावरुन 250 फूट खोल दरीत पडल्यामुळे करुणाला प्राण गमवावे लागले. तळेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या हार्दिक माळीचा मृत्यू (Pune Tikona Fort Youth Death) झाला.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्यावर काल (बुधवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हार्दिक दरीत पडला होता. किल्ल्यावरील तळ्याच्या मागील बाजूच्या बुरुजावरुन सुमारे 250 फूट खोल दरीत तो पडला. मात्र त्याचा मृतदेह शिवदुर्ग मित्र’ या लोणावळ्यातील रेस्क्यू टीमने चार वाजण्याच्या सुमारास बाहेर काढला.

तळेगावमधील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे तीन युवक सकाळच्या सुमारास तिकोणा किल्ल्यावर फिरायला गेले होते. यावेळी हार्दिक माळीच्या मोबाईलचे हेडफोन काही फूट अंतरावर खाली पडले. ते उचलण्यासाठी हार्दिक कसरत करत होता, या प्रयत्नात तोल जाऊन वरण तळ्याच्या मागील बुरुजावरुन तो तब्बल 250 फूट खाली पडला.

तिकोणा किल्ल्यावरील गड भटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हार्दिकचा शोध घेतला, परंतु बराच वेळ तो सापडत नव्हता. त्यानंतर, या घटनेची माहिती लोणावळ्यामधील शिवदुर्ग मित्र टीम आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. सर्वजण गडावर दाखल झाले आणि एकत्रित शोधमोहीम सुरु केली.

प्रेमसंबंधानंतर महिला पोलिसाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांना हार्दिकचा मृतदेह दरीत सापडला. उंचावरुन पडल्यामुळे गंभीर जखमी होऊन हार्दिकचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह (Pune Tikona Fort Youth Death) ट्रॉलीच्या साहाय्याने किल्ल्यावर आणून तिथून गडाच्या खाली नेण्यात आलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.