बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकातील ‘तो’ वादग्रस्त पाठ अभ्यासातून कमी, परीक्षेत प्रश्नही नसणार

यंदाच्या शैक्षणिक वर्षात अंतर्गत मूल्यमापन तसेच वार्षिक परीक्षेत कोणताही प्रश्न विचारला जाणार (SSC Balbharti Mistaken Chapter Was reduced) नाही.

बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकातील 'तो' वादग्रस्त पाठ अभ्यासातून कमी, परीक्षेत प्रश्नही नसणार
Follow us
| Updated on: Jul 26, 2020 | 5:50 PM

पुणे : बालभारतीच्या मराठी आठवीच्या पाठ्यपुस्तकातील ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ हा वादग्रस्त पाठ अभ्यासक्रमातून कमी करण्यात आला आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षात अंतर्गत मूल्यमापन तसेच वार्षिक परीक्षेत कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. त्यामुळे या पाठावर कोणतीही परीक्षा होणार नाही, बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी याबाबतची माहिती दिली. (SSC Balbharti Eight Standard Book Mistaken Chapter Was reduced)

बालभारतीचे इयत्ता 8 वीचं मराठीचं पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’, या पाठात चूक असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर अनेकांनी याबाबत टीका केली होती. या टीकेनंतर यंदा आठवीच्या अभ्यासक्रमातून ते कमी करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकातील दोन ते सहा या क्रमांकाचे पाठ कमी केला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षेत या पाठातील कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. या पाठावर कोणतीही परीक्षा होणार नाही.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कपात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत यंदाचा पाठ अभ्यासासाठी कमी केला आहे.

“आठवीच्या अभ्यासक्रमातील कोणताही पाठ वगळण्यात आलेला नाही. संबंधित पाठ फक्त अभ्यासाला घेतलेला नाही. कोणत्याच पुस्तकातून काहीच वगळलेलं नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. स्वाध्याय किंवा प्रश्नपत्रिकेत त्याच्यावर कोणताही प्रश्न येणार नाही. मुलं यासंदर्भात स्वयंअध्ययन करू शकतात. मात्र त्यावर कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही,” असे स्पष्टीकरण बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी दिले.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु या तिघांची नावे देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या मनावर कोरलेली आहेत. मात्र प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांच्या “माझ्या देशावर माझे प्रेम आहे” या पाठात चूक झाल्याचे निदर्शनास आले होते.

 नेमका उल्लेख काय?

“देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम हवे, होय ना?” “बरोबर आहे” मुले म्हणाली. एक मुलगा म्हणाला, “भगतसिंह, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते” मी विचारले “ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी… (SSC Balbharti Eight Standard Book Mistaken Chapter Was reduced)

संबंधित बातम्या : 

बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात घोडचूक, भगतसिंह, राजगुरुंसह कुरबान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.