अंकशास्त्रानुसार या तारखेला जन्मलेली लोकं पैसे कमवण्यात असतात हुशार! शनि महाराजांची असते कृपा

अंकशास्त्रात अंकांचं गणित मांडून भाकीत वर्तवलं जातं. प्रत्येक अंकांवर ग्रहांची दृष्टी असते. त्यामुळे कोणता अंक फलदायी ठरले आणि कोणत्या ग्रहाची कृपा ठरेल हे ठरवलं जातं. अंकशास्त्रात एक अंक खूपच लकी मानला जातो. त्या अंकाच्या लोकांना पैसे कमवण्याची जाण असते. चला जाणून घेऊयात..

अंकशास्त्रानुसार या तारखेला जन्मलेली लोकं पैसे कमवण्यात असतात हुशार! शनि महाराजांची असते कृपा
अंकशास्त्र
Image Credit source: टीव्ही 9 कन्नड
| Updated on: Apr 16, 2025 | 8:07 PM

अंकशास्त्रात 1 ते 9 या अंकांचं गणित मांडलं जातं. भाग्यांक आणि मूलांक काढला जातो. मूलांक हा ज्या जन्मतिथीला जन्म झाला त्याची बेरीज करून काढला जातो. एकेरी असेल तर प्रश्नच नाही. पण दोन अंकी असेल तर त्याची बेरीज करून ठरवला जातो. प्रत्येक अंकावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचं अधिपत्य आहे. 1 अंकावर सूर्य, 2 अंकावर चंद्र, 3 अंकावर गुरु, 4 अंकावर राहुल, 5 अंकावर बुध, 6 अंकावर शुक्र, 7 अंकावर केतु, 8 अंकावर शनि आणि 9 अंकावर मंगळाचं अधिपत्य असतं. मूलांक 8 असलेल्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा असते. शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांना मूलांक हा 8 असतो. या तारखेला जन्मलेल्या लोकांना भाग्यपेक्षा कर्मावर विश्वास असतो. तसेच शनिदेवांची विशेष कृपा असते. या लोकांचा आर्थिक व्यवहार स्पष्ट असतो. पैशांचा व्यवहार व्यवस्थितरित्या हाताळतात. चला जाणून घेऊयात 8 अंकाच्या व्यक्तिमत्वाबाबत

धन संपत्तीचे मालक

अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो अशा लोकांवर शनिमहाराजांची कृपा असते. त्यामुळे या व्यक्तींच्या कामात व्यवस्थितपणा असतो. कामात दिरंगाई होत असली तरी व्यवस्थितरित्या मॅनेज करतात. गोष्टी विखुरलेल्या अजिबात आवडत नाहीत. अध्यात्मिकतेची आवड असते. कामं करताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ नसतो आणि निमुटपणे कधी कामं करतात कळत देखील नाही. मेहनती असतात आणि आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर चांगले पैसे कमवतात. आपल्यासोबत इतरांवरही पैसा खर्च करतात.

पैसे कमवण्यात हुशार

8 मूलांक असलेल्या व्यक्ती पैसे कमवण्यात हुशार असतात. त्यांना योग्य पद्धतीने पैसे कमवण्याची जाणीव असते. कर्माच्या आधारावर पैसे कमवण्यावर विश्वास असतो. खरं तर 8 अंकांच्या व्यक्तींवर वैराग्याचा प्रभाव असतो. त्यामुळे एकटं राहणं पसंत करतात. समाजात जास्त मिसळत नाहीत. तसेच आपलं लक्ष्य गाठण्याकडे कल करतो. या व्यक्तींना वयाच्या 30 व्या वर्षानंतर पैसा मिळतो.

या क्षेत्रात उद्योग आणि करिअर करू शकतात

अंकशास्त्रानुसार 8 हा शनिचा अंक आहे. शनिच्या निगडीत व्यवसायात प्रगती आणि पैसा मिळतो. जसं की पेट्रोल, तेल, लोह आणि खनिज पदार्थांशी निगडीत उद्योगधंद्यात यश मिळतं. इतकं काय तर नोकरीत इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, तेल, पेट्रोल पंप, रियल इस्टेट या सारख्या कामातून यश मिळतं. त्यामुळे 8 अंक असलेल्या व्यक्तींना हे उद्योग आणि नोकरी फळते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)