एक वर्षानंतर सूर्य आणि बुध येणार एकत्र, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्तम वेळ!

ज्योतिषशास्त्रानुसार ठरावीक कालावधीनंतर ग्रह राशी बदलत असतात. त्यामुळे कधी कधी एकाच राशीत एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र येतात. जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर सूर्य आणि बुध ग्रह मकर राशीत एकत्र येणार आहेत. त्यामुळे राशीचक्रातील काही राशींना लाभ मिळणार आहे.

एक वर्षानंतर सूर्य आणि बुध येणार एकत्र, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्तम वेळ!
ग्रहांच्या गोचरात सूर्य आणि बुधाची होणार युती, या राशींना आर्थिक चुका सुधारण्यासाठी संधी
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 5:13 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवांनी मकर राशीत प्रवेश केला आहे. या राशीत सूर्यदेव महिनाभर राहणार आहेत. 13 फेब्रुवारीपर्यंत राशीत राहणार आहे. त्यामुळे 13 दिवस मकर राशीत बुध आणि सूर्याची होईल युती होईल. त्यानंतर वर्षभरानंतर कुंभ राशीत युती होणार आहे. कारण या दोन्ही ग्रहांचा गोचर कालावधी मागेपुढे आहे. बुध ग्रह धनु राशीतून मकर राशीत 1 फेब्रुवारीला प्रवेश करणार आहे. दुपारी 2 वाजून 23 मिनिटांनी हा प्रवेश करेल. त्यानंतर 20 फेब्रुवारीला मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. या राशीत 7 मार्चपर्यंत राहील. बुध हा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असून या दोन्ही ग्रहांमध्ये मित्रत्व आहे. तसेच या ग्रहांच्या युतीला बुधादित्य योग सांगितलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ योग आहे. या युतीचा तीन राशींच्या जातकांना जबरदस्त लाभ होणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळेल ते

कुंभ – या राशीच्या जातकांना सूर्य आणि बुधाच्या युतीचा लाभ मिळेल. कारण काही दिवसानंतर या राशीत ग्रहांची युती होणार आहे. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नव्या लोकांशी भेटीगाठी होतील. तसेच काही लोकांसोबत असलेला वाद संपुष्टात येईल. आपण हाती घेतलेल्या कामात सकारात्मक प्रभाव दिसून येईल. विवाहासाठी स्थळ शोधणाऱ्या जातकांना अपेक्षित प्रस्ताव येऊ शकतो.

मिथुन – या राशीच्या जातकांना नशिबाची उत्तम साथ मिळेल. हाती जे काम घ्याल ते पूर्णत्वास न्याल. ग्रहांची उत्तम साथ या कालावधीत लाभेल. कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो. पण हाती घेतलेलं काम पूर्णत्वास जाईल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. कौटुंबिक स्तरावर आनंदाचं वातावरण होईल. घरातील सकारात्मक वातावरणाचा प्रभाव तुमच्यावर पडेल.

सिंह – गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. खऱ्या अर्थाने मेहनतीला यश मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ या कालावधीत लाभेल. आपल्या दु:खात मिळालेली साथ कधीच विसरता येणार नाही. पार्टनरशिपच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेला पैसा मिळेल. त्यामुळे जीव भांड्यात पडेल. आर्थिक जोखिम घेताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.