Grah Gochar 2023 : चंद्रग्रहणानंतर हा ग्रह करणार गोचर, उच्च स्थानामुळे या 7 राशी ठरणार लकी

Astrology 2023 : 2023 या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 5 मे रोजी असणार आहे. त्यानंतर ग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा असलेला मंगळ ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे सात राशींना जबरदस्त फायदा होणार आहे.

Grah Gochar 2023 : चंद्रग्रहणानंतर हा ग्रह करणार गोचर, उच्च स्थानामुळे या 7 राशी ठरणार लकी
Grah Gochar 2023 : चंद्रग्रहणानंतर या ग्रहाच्या गोचरामुळे 7 राशींना लाभ, प्रवास-धनलाभ आणि यश मिळवणारा योग
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 2:26 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचराचा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येक स्थितीवर ज्योतिषांची बारीक नजर लागून असते. त्यानुसार फलज्योतिष ठरवलं जातं. 5 मे 2023 रोजी चंद्रग्रहण आहे. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 10 मे रोजी ग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा असलेला मंगळ ग्रह रास बदलणार आहे. 10 मे 2023 रोजी कर्क राशीत प्रवेश करेल आणि 1 जुलैपर्यंत या राशीत राहील. मंगळ ग्रह जवळपास 82 दिवस या राशीत राहील त्यानंतर सिंह राशीत प्रस्थान करेल. मंगळाच्या या स्थितीमुळे राशीचक्रातील 7 राशींना जबरदस्त फायदा होणार आहे.

या सात राशींना होणार जबरदस्त फायदा

मेष : मंगळाचं गोचर मेष राशीला शुभ राहील. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. उद्योग धंद्यात सकारात्मक बदल दिसून येईल. करिअरमधील बऱ्याच चांगल्या गोष्टी घडतील. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डोक्यावर असलेला भार हलका होईल.

कन्या : मंगळाच्या गोचरामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात वृद्धी आणि कामात यश मिळेल. उद्योग धंद्याचा विस्तार करण्यासाठी योग्य वेळ आहे. खर्च कमी झाल्याने पैशांची बचत होईल. कौटुंबिक कलह दूर झाल्याने मानसिक समाधान लाभेल.

धनु : मंगळ गोचराचा धनु राशीच्या लोकांनाही फायदा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. धनप्राप्तीचे योग जुळून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. अपघात होण्याची शक्यता आहे.

कुंभ : मंगळाच्या गोचरामुळे खर्चात वाढ होईल पण उत्पन्न वाढल्याने फायदा होईल. समाजात मानसन्मान वाढेल. काही छोटे प्रवास घडण्याची शक्यता राहील. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. पदोन्नती आणि पगारवाढ होऊ शकते.

वृश्चिक : मंगळ गोचरामुळे लांबचा प्रवास घडू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. घरात मंगळकार्य किंवा धार्मिक विधी पार पडू शकतो. या राशीवर मंगळाचा अधिपत्य असल्याने फायदा होईल.

मीन : या राशीसाठी मंगळाचं गोचर प्रगतीपथावर नेणारा आहे. विदेशात शिक्षणाची संधी मिळेल. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीची नवीन ऑफर या काळात मिळू शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.