Aries/Taurus Rashifal Today 30 June 2021 | निष्काळजीपणाने वागू नका, नोकरदारांना टार्गेट पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल

बुधवार 30 जून 2021 (Aries/Taurus Rashifal). बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो. बुधवारी विघ्नहर्त्याची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व विघ्न दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल.

Aries/Taurus Rashifal Today 30 June 2021 | निष्काळजीपणाने वागू नका, नोकरदारांना टार्गेट पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल
Aries_Taurus

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : बुधवार 30 जून 2021 (Aries/Taurus Rashifal). बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो. बुधवारी विघ्नहर्त्याची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व विघ्न दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या बुधवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aries/Taurus Daily Horoscope Of 30 June 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today) –

मेष राश‍ी ( Aries), 30 जून

यावेळी ग्रह संक्रमण आपल्यासाठी अनेक शुभ संधी आणत आहे. परंतु आपल्या महत्वाकांक्षा आणि स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. पॉलिसी इत्यादी भांडवलाची गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना योग्य निकाल मिळतील.

परंतु, आळशीपणामुळे आपण काही कामं अपूर्ण ठेवू शकता. निष्काळजीपणाने वागू नका. कोणत्याही प्रकारची कोंडी झाल्यास, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, तुम्हाला नक्कीच योग्य मार्गदर्शन मिळेल.

व्यवसायाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. नोकरदारांना टार्गेट पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल.

लव्ह फोकस – नवरा-बायकोच्या नात्यात मधुरता राहील. व्यस्तता असूनही, कुटुंबासाठी वेळ दिल्यामुळे घराचे वातावरण सुखद राहील.

खबरदारी – थकवा आणि अशक्तपणापासून मुक्त होण्यासाठी आपल्या आवडीच्या कामात थोडा वेळ घालवा. तसेच, विश्रांती घेणे देखील महत्वाचे आहे.

लकी रंग- लाल
लकी अक्षर- जी
फ्रेंडली नंबर- 5

वृषभ राश‍ी (Tauras), 30 जून

तुमचा धार्मिक आणि अध्यात्मिक कार्याकडे कल असेल. आपल्या संतुलित आणि सकारात्मक विचारसरणीने हे काम नियोजित पद्धतीने पूर्ण होईल. कोणतेही पेमेंट वगैरे मिळाल्याने आर्थिक समस्या सुटतील.

अहंकार आणि अति आत्मविश्वास ही तुमची मुख्य कमजोरी आहे. हे नियंत्रणात ठेवा. अज्ञात व्यक्तींशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, आपली फसवणूक होऊ शकते. ऑनलाईन कामांवर आणि मित्रांसोबत आपला बराच वेळ वाया घालवू नका.

व्यावसायिक काम नेहमीप्रमाणे सुरु राहतील. फारशी सुधारणा होण्याची शक्यता नाही. परंतु, आज मालमत्ता व्यवसायात उचित सौदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना अधिकृत प्रवासाशी संबंधित ऑर्डर मिळतील ज्या फायदेशीर ठरेल.

लव्ह फोकस – आपल्या जोडीदाराच्या भावना आणि आरोग्याची काळजी घ्या. अविवाहित लोकांसाठी एक चांगले स्थळ येऊ शकते.

खबरदारी – डोकेदुखी आणि मायग्रेनसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी उष्णतेपासून स्वत:चे रक्षण करा. थंड पदार्थांचे सेवन करा.

लकी रंग – हिरवा
लकी अक्षर- अ
फ्रेंडली नंबर- 9

Aries/Taurus Daily Horoscope Of 30 June 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Aries/Taurus Rashifal Today 29 June 2021 | सकारात्मकता जाणवेल, इतरांच्या बोलण्यावर नाही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा

Aquarius/Pisces Rashifal Today 29 June 2021 | व्यवसायात समजूतदारपणाची गरज, लग्नाशी संबंधित चांगली बातमी मिळेल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI