AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro Tips : तुमच्या राशीनुसार धारण करा रूद्राक्ष, होतील चमत्कारिक फायदे

Rudraksha रूद्राक्ष धारण केल्याने साधकाचे संकटांपासून संरक्षण होते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. एवढेच नाही तर रुद्राक्षला विज्ञानातही खूप प्रभावी मानले गेले आहे. हिंदू धर्मात रुद्राक्षाचे विशेष महत्त्व आहे.

Astro Tips : तुमच्या राशीनुसार धारण करा रूद्राक्ष, होतील चमत्कारिक फायदे
रूद्राक्षImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 24, 2023 | 6:39 PM
Share

मुंबई : मान्यतेनुसार, रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली आहे. त्यामुळे रुद्राक्ष (Rudhraksha) धारण केल्याने शिवाची कृपा शिव भक्तावर कायम राहते. ते धारण केल्याने साधकाचे संकटांपासून संरक्षण होते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. एवढेच नाही तर रुद्राक्षला विज्ञानातही खूप प्रभावी मानले गेले आहे. हिंदू धर्मात रुद्राक्षाचे विशेष महत्त्व आहे. रुद्राक्ष धारण करण्याचे अनेक फायदे ज्योतिषशास्त्रात (Astro Tips) सांगण्यात आले आहेत. 1 ते 14 मुखी रुद्राक्षाचे स्वतःचे महत्त्व आहे. यासोबतच व्यक्तीने आपल्या राशीनुसार कोणता रुद्राक्ष धारण करावा हे देखील सांगण्यात आले आहे.

या राशीच्या लोकांनी धारण करावा तीन मुखी रूद्राक्ष

ज्योतिषशास्त्रानुसार मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी तीनमुखी रुद्राक्ष धारण करावा. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होते.

6 मुखी रुद्राक्ष

वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांनी 6 मुखी रुद्राक्ष धारण करावे. सहामुखी रुद्राक्ष धारण केल्याने आरोग्याला लाभ मिळतो, तर प्रगतीचा मार्गही खुला होतो.

4 मुखी रुद्राक्ष

मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांनी 4 मुखी रुद्राक्ष धारण करावे. असे केल्याने या राशीच्या लोकांसाठी प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता वाढते.

2 मुखी रूद्राक्ष

कर्क राशीचे लोक दोन मुखी रुद्राक्ष धारण करू शकतात. चंद्र कर्क राशीचा ग्रह असल्यामुळे त्यांच्यासाठी दोन मुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते.

सिंह राशीसाठी रुद्राक्ष

सिंह राशीसाठी बारा मुखी रुद्राक्ष योग्य मानले जाते. त्यांच्या विकासासाठी हे शुभ मानले जाते.

5 मुखी रुद्राक्ष

दुसरीकडे, धनु आणि मीन राशीचे लोक 5 मुखी रुद्राक्ष धारण करू शकतात. हे धारण केल्याने समाजात मान-सन्मान मिळतो. यासोबतच नशीबही तुमची साथ देते.

 7 मुखी रुद्राक्ष कोणासाठी?

मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना 7 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने लाभ होऊ शकतो. सात मुखी रुद्राक्ष धारण केल्याने सर्व वाईट गोष्टी घडू लागतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.