AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: 2023 हे वर्ष या राशींसाठी असणार प्रगतीचे, अपूर्ण कामं होणार पूर्ण

2023 हे वर्ष काही राशींसाठी प्रगतीचे नवीन मार्ग घेऊन येणार आहे. तुमची रास यापैकी आहे का?

Astrology: 2023 हे वर्ष या राशींसाठी असणार प्रगतीचे, अपूर्ण कामं होणार पूर्ण
वार्षिक राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 16, 2022 | 5:12 PM
Share

मुंबई,  नवीन वर्ष सुरू होण्यासाठी  थोडाच अवधी शिल्लक आहे. 2023 हे वर्ष लोकांसाठी नव्या आशा आणि नवीन संकल्प घेऊन येणार आहे. 2023 हे वर्ष आपले चांगले दिवस घेऊन येईल अशी प्रत्त्येकाला आशा आहे. अशा स्थितीत ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीनुसार ज्योतिषांनी 2023 मध्ये राशींची स्थिती (2023 Horoscope) सांगितली आहे. हे वर्ष अनेक राशींना भरपूर लाभ देईल, तर काही लोकांना संघर्ष आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. 2023 हे वर्ष तुमच्या राशीसाठी कसे असेल हे आपण जाणून घेऊया.

  1. मेष- 2023 हे वर्ष तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल. हे वर्ष तुमची आर्थिक स्थिती समृध्द होण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, परंतु तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण मिळवावे लागेल, तसेच शॉर्टकट पद्धतीने पैसे मिळवणे टाळावे लागेल. अन्यथा तुमच्या अडचणी वाढू शकतात. नातेसंबंधांच्या बाबतीत, 2023 हे वर्ष तुमच्यासाठी सरासरी असेल.
  2. वृषभ- या वर्षी तुम्हाला तुमचे करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. मात्र, तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. हे वर्ष तुम्हाला मोठे यश देईल. या वर्षाच्या मध्यात तुमच्यासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो.
  3. मिथुन- या वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी काहीशी कमकुवत राहील. तुम्हाला आर्थिक आणि शारीरिक समस्या भेडसावू शकतात, कारण वर्षाच्या सुरुवातीला शनी तुमच्या आठव्या भावात शुक्रासोबत आणि मंगळ बाराव्या भावात प्रतिगामी असेल. पण 17 जानेवारीला शनि तुमच्या आठव्या भावातून नवव्या भावात जाईल आणि तुमच्यासाठी चांगले दिवस सुरु होतील. यानंतर, तुम्हाला पैसा, शिक्षण आणि आरोग्य या बाबतीत बरेच फायदे मिळतील.
  4. कर्क- वर्ष 2023 मध्ये तुम्हाला मालमत्ता खरेदी-विक्री करून आर्थिक लाभ मिळू शकतो. या वर्षी तुमची कारकीर्द उंचीवर जाईल आणि तुम्हाला चांगले यश मिळेल. विद्यार्थ्यांना यावर्षी विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचा अभ्यास चुकला असेल, तर तो पुन्हा सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
  5. सिंह- वर्ष 2023 च्या सुरुवातीला आर्थिक लाभ होण्याची उत्तम शक्यता आहे. तुमच्या शिक्षणातही महत्त्वाचे यश मिळण्याची शक्यता आहे. ग्रहांची जुळवाजुळव तुम्हाला ज्ञान मिळविण्यात मदत करेल आणि तुम्ही एक चांगला विद्यार्थी म्हणून पाहाल. जे लोक सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष खूप लकी ठरू शकते.
  6. कन्या- या वर्षी तुम्हाला अचानक काही चांगले परिणाम मिळू शकतात. काही अनपेक्षित घटनांनंतर तुम्ही तुमच्या नशिबावर विश्वास ठेवाल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. समस्यांची शृंखला थांबेल. विरोधकांचे डावपेच अयशस्वी होतील.
  7. तूळ- नवीन वर्ष 2023 च्या सुरुवातीला मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते. तुम्ही तुमचे आवडते वाहन देखील खरेदी करू शकता. तुमची संपत्ती वाढेल आणि कार्यक्षेत्रात यश मिळेल. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कठोर परिश्रमाने भरलेले असेल, वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल.
  8. वृश्चिक- नवीन वर्ष 2023 वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वर्षाची सुरुवात चांगली होईल, कारण तुम्ही धैर्य आणि शौर्याने परिपूर्ण असाल. व्यवसायात जोखीम पत्करून ती पुढे नेतील. मोठ्या गुंतवणुकीतून मिळणारा नफा पाहून मन प्रसन्न राहील. या वर्षी तुमच्या मुलाचीही खूप प्रगती होईल. विवाह इच्छुकांचे लग्न जमेल.
  9. धनु- या वर्षी प्रेमप्रकरणात सावध राहावे लागेल. नात्यात दुरावा येऊ शकतो. कौटुंबिक वातावरण बिघडू शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या मुलांबाबतही काही समस्या असू शकतात. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाग्रतेकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीनेही हे वर्ष तुमच्यासाठी फारसे चांगले जाणार नाही. त्यामुळे घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
  10. मकर- आर्थिक बाबींमध्ये कुटुंबाला फायदा होईल. मालमत्तेची खरेदी-विक्री करून नफा मिळवू शकता. नवीन मालमत्ता खरेदी करण्यात किंवा घर बांधण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. या दरम्यान सासरच्या मंडळींकडून काही मदत मिळू शकते. भक्कम आर्थिक स्थितीमुळे तुम्ही दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीनेही हे वर्ष अनुकूल दिसत आहे.
  11. कुंभ- 2023 मध्ये कुंभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. शिस्तबद्ध राहून तुमची कामे पूर्ण कराल. नवीन व्यापार करार होतील. नवीन लोक भेटतील, जे तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात मदत करतील. नोकरदारांना बढती-वाढ मिळू शकते. वैवाहिक जीवनातील तणाव आणि मतभेदापासून सुटका मिळेल.
  12. मीन- मीन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष सामान्य राहणार आहे. तुम्हाला फारसा फायदा होणार नाही किंवा मोठे नुकसान होण्याची शक्यताही नाही. उत्पन्नाच्या स्त्रोतांमधून पुरेसे पैसे मिळत राहतील, परंतु खर्च वाढतच राहतील. मुलांच्या शिक्षणासाठी काळ चांगला जाणार आहे. कुटुंबात काही चढ-उतार असू शकतात, परंतु तुम्ही ते सहज सोडवू शकाल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.