AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: रविवारचे राशी भविष्य, ‘या’ राशिच्या लाेकांना अडकलेले पैसे परत मिळणार

आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस.

Astrology: रविवारचे राशी भविष्य, 'या' राशिच्या लाेकांना अडकलेले पैसे परत मिळणार
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 26, 2022 | 7:52 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- मोठ्यांचा सन्मान करा. घरातील मोठ्या व्यक्तींकडून संपत्तीचा वारसा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी अडकलेले सर्व व्यवहार मार्गी लागतील. कोणा जवळच्या व्यक्तीचं मन दुखावू नका. वाद मिटवा.
  2. वृषभ- जोडीदाराचा सन्मान करा. गरीब माणसाला मदत करा. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. आज आर्थिक प्रकरणं मार्गी लागतील. धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल.
  3. मिथुन- नोकरी मिळवण्यात यश मिळेल. पाठदुखीची समस्या तुम्हाला सतावेल. लग्नाचे योग आहेत. सद्यस्थिती पाहता भविष्यातील बेत आखत त्या मार्गानं काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. आताच आराखडा तयार करा, भविष्य घडवण्याची संधी तुमच्या हाती आहे.
  4. कन्या- नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण जरा जास्त असेल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा.
  5. सिंह- कामातील काही गोष्टींकडे गांभीर्यानं पाहा, अडकलेले पैसे परत मिळण्याची संधी आहे. वेळ व्यर्थ जाणार नाही याकडे लक्ष द्या.
  6. कर्क- मित्रांकडून सहकार्य मिळेल. भावंडांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. गरजूंना अन्नदान करा. आज आरोद्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे.
  7. तुळ- तुमच्या भागीदारीवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला नवीन नोकरी मिळेल. आईच्या सल्ल्याचे पालन करा. आरोग्याची काळजी घ्या.  धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा.  कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.
  8. वृश्चिक- नोकरी व्यवसायात बदल करू नका. जुने मित्र भेटतील. मोठे व्यवहार टाळा. आज शक्यतो आराम करा. अधिकचा ताण घेऊ नका. गोष्टी मनाजोग्या होतील फक्त थोडा वेळ द्या.
  9. धनु- व्यापारामध्ये लाभ होणार आहे. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे. आज कुटुंबातील काही व्यक्तींशी चांगला संवाद साधू शकाल.
  10. मकर- वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमची सही कागद पाहिल्यानंतरच करा. प्रवास लाभदायक ठरेल. धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा.  कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.
  11. कुंभ- नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण जरा जास्त असेल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा. आरोग्याची काळजी घ्या.
  12. मीन- नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदाचा आहे. धनलाभ होणार आहे. रखडलेले व्यवसाय चालू होतील. ज्येष्ठांचा आशीर्वीद मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.