AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानने घेतला 400 लोकांचा जीव, भारत थेट मदतीला, भारतातून तब्बल…

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. सतत हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच मोठा हल्ला अफगाणिस्तानकडून करण्यात आला. या हल्ल्यात 400 पेक्षा जास्त अफगाणिस्तानी नागरिकांचा जीव गेला. यानंतर भारताने आता मोठे पाऊस उचलले आहे.

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानने घेतला 400 लोकांचा जीव, भारत थेट मदतीला, भारतातून तब्बल...
India
| Updated on: Mar 21, 2026 | 9:20 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पेटलेले असताना दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातही मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. पाकिस्तानने केलेल्या अफगाणिस्तानवरील हल्ल्यात 400 लोकांचा जीव गेला. इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 20 वा दिवस आहे. या युद्धामुळे संपूर्ण जंग संकटात आहे. मात्र, पाकिस्तानचे काही वेगळेच सुरू आहे. पाकिस्तानमध्येही कच्च्या तेलाची मोठी कमी आहे. लोकांना गॅस मिळत नाहीये. मात्र, अफगाणिस्तानवर मोठे हल्ले पाकिस्तानकडून केली जात आहेत. अफगाणिस्ताननेही पाकिस्तानच्या प्रमुख हवाई लष्कर तळांना टार्गेट करत हल्ला केला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. पाकिस्तानकडून मोठा हवाई हल्ला अफगाणिस्तानमध्ये करण्यात आला. दहशतवादी अड्डा समजून पाकिस्तानने एका रूग्णालयावर हल्ला केला. या हल्ल्यात 400 पेक्षाही अधिक निर्दाेष लोकांचा जीव गेला. अफगाणिस्तानकडून या हल्ल्याचा बदला घेण्याचा थेट मोठा इशारा देण्यात आला.

कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणाव बघायला मिळत आहेत. यादरम्यानच या वाईट स्थितीत भारत अफगाणिस्तानच्या मदतीला धावून गेला आहे. भारतातून मोठी मदत अफगाणिस्तानमध्ये पाठवण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध कायमच चांगले राहिले.

काबुलमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या विनाशानंतर भारताने अफगाणिस्तानमध्ये 2.5 टन आपत्कालीन वैद्यकीय मदत पाठवली आहे. यामध्ये काही गोळ्या, मेडिकल डिस्पोजेबल किट आणि काही वैद्यकीय उपकरणे देखील आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना याची मदत व्हावी, याकरिता भारताने ही मदत पाठवली आहे. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मार्चच्या रात्री पाकिस्तानच्या सैन्याने काबूलच्या रूग्णालयाला टार्गेट बनून मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 400 लोक ठार झाले. 250 पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यात यश मिळाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संयुक्त राष्ट्र अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या हल्ल्याचा निषेधही केला.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?