Maharashtra News LIVE : चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया..
Maharashtra News LIVE Updates: भोंदूबाबा अशोक खरातसोबतचे फोटो , व्हिडीओ समोर आल्यावर रुपाली चाकणकरांवर चहूबाजूंनी टीका झाली. त्यांनी अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणाची चौकशी होऊन कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
धाराशिव जिल्ह्यातील तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आमदार बबनराव लोणीकरांचा गंभीर आरोप
धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिवच्या तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी एक मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलाय. धाराशिव तालुक्यातील वडगाव येथील गट क्रमांक 395 बाबत 2024 मध्ये बेकायदेशीर अकृषक आदेश काढण्यात आला असून त्यासाठी 2017 च्या जुन्या नगर रचना अहवालाचा आधार घेतला असल्याचही बबनराव लोणीकर यांनी म्हटले. 2020 नंतर लागू झालेल्या सुधारित नियमानुसार दहा टक्के खोली जागा आणि दहा टक्के सोयी सुविधा क्षेत्र राखणे बंधनकारक असताना संबंधित तहसीलदारांनी सोई सुविधा क्षेत्र पूर्णपणे न सोडता त्यावरही प्लॉट्स तयार करून खाजगी बांधकाम व्यावसायिकाला कोट्यावधी रुपयाचा फायदा करून दिल्याचे म्हटलं त्यामुळे हा प्रकार नियम भंग नसून स्पष्टपणे संगणमताने केलेला आर्थिक गैरव्यवहार आहे असे देखील ते म्हणतात. दरम्यान तहसीलदारांनी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता जमा केली असून त्यांना तात्काळ निलंबित करावे आणि त्यांच्या सर्व मालमत्तेची सखोल चौकशी करून संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हा नोंद करून फौजदारी कारवाई सुरू करावी अशी मोठी मागणी बबनराव लोणीकर यांनी केली…
-
बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार आणि आसपासच्या परिसराला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका
बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार परिसरासह आसपासच्या गावांना अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलाय. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामातील उभी पिके मोठ्या प्रमाणात आडवी झाली आहेत. प्रामुख्याने रब्बी हंगामातील गहू,ज्वारी यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी पिके पूर्णपणे जमिनीवर कोसळल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नुकसानीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
-
-
जीवन वाहिनी गोदावरी नदी बनलीय विषारी
शहरातील ड्रेनेजचे पाणी नदी सोडलं जात असल्याने लाखो माशांचा मृत्यू. सहा ते सात चेंबर मधून गोदावरीच्या नदीपात्रात सोडलं जातं शहरातील घाण पाणी. केमिकल युक्त पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज. गोवर्धन घाट परिसरात पसरला दुर्गंध. कोट्यावधी रुपये खर्चूनही गोदावरी विषारीच. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने आदेश देऊन ही कारवाई होईना. कोट्यवधी रुपये खर्चून ही नदी स्वच्छ होत नसल्याचा आरोप
-
रूपाली चाकणकर यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता – यशोमती ठाकूर
रूपाली चाकणकर यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. ज्या ज्या मंत्र्यांचे लोकांचे तो भोंदू बाबा अशोक खरात सोबत फोटो आहेत त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे. जादूटोणा विरोधी कायद्याची अंबलबजावणी झाली पाहिजे – यशोमती ठाकूर
-
रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा पहिला टप्पा – अंजली दमानिया
रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा पहिला टप्पा आहे, यापुढे अनेक गोष्टी झाल्या पाहिजेत. खरात प्रकरणात अनेक नावं पुढे आली पाहिजेत. रुपाली चाकणकरांवर कारवाई झाली पाहिजे – अंजली दमानिया
-
-
पुणे-नागपूर-हडपसर व मुंबई-नागपूर-मुंबई विशेष गाड्या
उन्हाळी सट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई-नागपूर-मुंबई आणि पुणे-नागपूर-हडपसर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यासह नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक गाडीचा विस्तार करण्यात आले. या गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
-
अंजली दमानिया यांचा मोठा आरोप..
राजीनामा देताना चाकणकर या पोझ देऊन उभ्या होत्या, असा मोठा आरोप अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आला आहे.
-
-
नाशिक – भोंदू खरातच्या PA नीरज जाधवला आज कोर्टात हजर करण्याची शक्यता
नाशिक – भोंदू कॅप्टन खरातच्या PA नीरज जाधवला पोलिस आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. नीरज जाधवला काल संध्याकाळी क्राइम ब्रँचने ताब्यात घेतलं. कॅप्टन खरातचे सगळे CCTV नीरज जाधवकडे असून खरातचे राजकीय आणि VIP लागेबांधे याची नीरज जाधवला संपूर्ण माहिती आहे. नीरज जाधवकडून आणखीही काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.
-
सोलापूर – मंत्री आशिष शेलार यांना नुकसानीची माहिती देताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडसाळी गावात अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष बाग भुईसपाट झाली. त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री आशिष शेलार हे शेतकऱ्याच्या बांधावर आले होते. मात्र माहिती देताना पडसाळी गावातील शेतकरी अंकुश शिरसाठ यांना अश्रू अनावर झाले होते.
-
मंत्री आशिष शेलार यांना नुकसानीची माहिती देताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडसाळी गावात अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष बाग भुईसपाट झालीय. याची पाहणी करण्यासाठी मंत्री आशिष शेलार हे शेतकऱ्याच्या बांधावर आले होते. पडसाळी गावातील शेतकरी अंकुश शिरसाठ यांना अश्रू अनावर झाले.
-
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आशिष शेलार
सोलापुरात मंत्री आशिष शेलार यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येतेय. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावात द्राक्षबाग भुईसपाट झालीय. त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री आशिष शेलार दाखल
-
बुलढाण्यात पोलिस बंदोबस्तात सिलेंडर वाटप, सकाळपासून एजन्सीवर नागरिकांची गर्दी
आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची भीती निर्माण झाल्याने बुलढाण्यात नागरिकांनी गॅस सिलेंडरसाठी गोडाऊनमध्ये सकाळपासून मोठी गर्दी केली आहे . गर्दीमुळे एजन्सी वर गोंधळ होत असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गॅस वितरकांनी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली असून पोलिस बंदोबस्तात गॅस सिलिंडर वाटप सुरू आहे.
-
मराठवाड्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान
राठवाड्यात ११ हजार ५७२ हेक्टरवरील शेतीपिकांचे अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ८ हजार ४५५ हेक्टरवरील शेतीपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १५ हजार ३०२ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. मात्र, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, काढणीला आलेला गहू, हरभरा, मका, बाजरी यासह आंबा, मोसंबी फळबागांचे नुकसान झाले. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
-
धाराशिव जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू ?
धाराशिव जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कला केंद्राच्या अडून वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवणाऱ्या 9 जणांवरती धाराशिवच्या ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कला केंद्राच्या आड चालणाऱ्या या रॅकेटचा पीडित महिलेनेच पर्दाफाश केल्यामुळे प्रकरण उघडकीस आलंय. जिल्ह्यातील कला केंद्रावर बंदी असताना कलाकेंद्रात वेश्या व्यवसाय कुणाच्या आशीर्वादाने सुरू? असा सवाल उपस्थित होत आहे.
-
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा – सुषमा अंधारेंची मागणी
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा. चाकणकरांना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा – सुषमा अंधारेंची मागणी
स्वयंघोषित कॅप्टन, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मंत्री दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी झाली. दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे SIT चौकशीच्या फेऱ्यात अडकला असून त्याची कसून चौकशी करण्यात आली. तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसात पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मराठवाड्यात 11 हजार 572 हेक्टरवरील शेतीपिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे 8 हजार 455 हेक्टरवरील शेतीपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यासह देश विदेश, मनोरंजन, क्रीडा, क्षेत्रासह राज्यातील ठळक बातम्यांचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचू शकता.
Published On - Mar 21,2026 8:55 AM
