AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astology: पती-पत्नीमध्ये उडत असतील सतत खटके तर कुंडलीत असू शकतो गुरु चांडाळ योग 

जोतिषशास्त्रानुसार सातवे घर हे विवाहाचे आणि जोडीदाराचे आहे. तसेच चौथे घर हे सुखाशी संबंधित आहे. या घरात जेव्हा राहू आणि आणि गुरु एकत्र येतात तेव्हा गुरू चांडाळ योग (Guru Chandal Yoga) तयार होतो. 

Astology: पती-पत्नीमध्ये उडत असतील सतत खटके तर कुंडलीत असू शकतो गुरु चांडाळ योग 
जोतिषशास्त्र Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 09, 2022 | 1:42 PM
Share

लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो. संसार सुखाचा व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असते, मात्र बऱ्याचदा पती-पत्नीमध्ये मतभेद किंवा इतर कारणांमुळे खटके उडतात. छोट्या-मोठ्या तक्रारी या प्रत्येकाच संसारात असतात पण भांडणं जेव्हा विकोपाला जातात तेव्हा तो चिंतेचा विषय बनतो. जोतिषशास्त्रानुसार (Astrology) वैवाहिक जीवनातील कलहामागे पत्रिकेतील दोष असू शकतात. यापैकी एक म्हणजे गुरू चांडाळ दोष आहे. जोतिषशास्त्रानुसार सातवे घर हे विवाहाचे आणि जोडीदाराचे आहे. तसेच चौथे घर हे सुखाशी संबंधित आहे. या घरात जेव्हा राहू आणि आणि गुरु एकत्र येतात तेव्हा गुरू चांडाळ योग (Guru Chandal Yoga) तयार होतो.

काय आहे गुरू चांडाळ योग?

ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योगांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्यापैकीच एक म्हणजे गुरू चांडाळ योग आहे.  कुंडलीतील कोणत्याही घरात राहूसोबत गुरू ग्रह स्थित असेल तर हा योग तयार होतो. ज्या घरामध्ये हा योग असतो त्या घराचे शुभ परिणाम कमी होतात. त्याच वेळी कुंडलीच्या वेगवेगळ्या घरांमध्ये त्याचा परिणाम थोडासा बदलतो. गुरू आणि राहु कोणत्या राशीत आहेत, त्याचबरोबर गुरू बलवान असेल तर हा या योगाची तीव्रता कमी होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु चांडाळ योग तयार होतो, तेव्हा ती व्यक्ती यशासाठी संघर्ष करत असते. पैशाची कमतरता पदोपदी जाणवते. जीवनात नकारात्मकता येते. पत्रिकेत सातवे घर हे विवाहाशी संबंधित आहे. या घरात राहू आणि गुरू एकत्र आल्यास वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतात.

या उपायांनी मिळतो लाभ

  1. गुरुवारी एकवेळचा उपवास करावा
  2. रोज 21 वेळा विष्णूचा जप करावा
  3. दर सोमवारी नागदेवतेचे दर्शन घ्यावे

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?