AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : राहू केतू वाढवणार या चार राशींच्या समस्या, आजपासूनच राहावे लागेल सावध!

या चार राशीच्या लोकांना आर्थिक, आरोग्य आणि करिअरच्या आघाडीवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, म्हणून त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

Astrology : राहू केतू वाढवणार या चार राशींच्या समस्या, आजपासूनच राहावे लागेल सावध!
राहू केतूImage Credit source: Social media
| Updated on: Mar 04, 2023 | 2:24 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह नियमित अंतराने भ्रमण करतात, ज्यामुळे मानवी जीवनावर परिणाम होतो. होळीच्या अवघ्या 4 दिवसांनी म्हणजेच 12 मार्चला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. जिथे राहू (Rahu ketu) आधीच स्थित आहे. ज्याचा प्रभाव 4 राशींवर होऊ शकतो. राहू-शुक्र संयोग मेष, वृषभ, कन्या आणि मीन राशीसाठी त्रासदायक असू शकतो.

मेष

या राशीच्या लोकांनी राहू आणि शुक्रापासून सावध राहण्याची गरज आहे. ही युती आरोग्यास हानी पोहोचवू शकते. गुप्त शत्रू सक्रिय होतील. लव्ह लाईफमध्ये फसवणुकीचा बळी होऊ शकतो. यासोबतच वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. पत्नीची तब्येत बिघडू शकते.

वृषभ

राहू आणि शुक्राचा संयोग अशुभ घडवून आणेल. आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. ऑफिसमध्ये तुम्ही स्वतःसाठी अडचणी निर्माण करू शकता. प्रेम आणि लग्नाच्या बाबतीत थोडे समजूतदार व्हा. हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. या काळात शनि मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

कन्या

राहू आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी वाईट काळ आणू शकतो. हा योग तुमच्या कुंडलीच्या आठव्या घरात तयार होईल. या काळात तब्येत बिघडू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कोणाशीही वाईट वागू नका. तुमचे कर्मच तुमचे भाग्य ठरवणार आहे. त्यामुळे लांबचा विचार करून निर्णय घ्या.

मीन

राहू आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. पैशाची कमतरता भासू शकते. कौटुंबिक सहकार्य मिळणार नाही. तुम्हाला मानसिक त्रास होईल. कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागेल. ऑफिसमध्ये कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. अनावश्यक साहस टाळा. गुंतवणूक करण्याआधी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.