Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 28 मार्च 2023, या राशीच्या लोकांना सामाजिक मान सन्मान मिळेल

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना व्यापारात मोठे लाभ होतील.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 28 मार्च 2023, या राशीच्या लोकांना सामाजिक मान सन्मान मिळेल
राशी भविष्यImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 12:05 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे भविष्य

मेष

विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस शुभ राहिल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील. प्रवास लाभदायक होतील.

वृषभ

मानसिक अशांती असल्याने संकटाचा सामना करावा लागेल. नोकरीत जबाबदारी नुसार कामे करा. कलह वाढविणारे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक पिडादायक दिनमान आहे. व्यवसायिक मंडळीने जपून आर्थिक करावे. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात निष्कारण गुंतला जाल. आर्थिक हानी संभवते स्वभावातील मानीपणा हट्टीपणा सोडा. कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. मानसिक स्वास्थ सांभाळा.

हे सुद्धा वाचा

मिथुन

विद्ववत्तेत वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. रोजगारात यश व लाभ मिळण्याची पुरेपुर शक्यता आहे. व्यवसायात विस्तारासंबंधी योजना आखाल. मनाजोग्या घटना घडतील. प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे आपल्या गोष्टी लोकपर्यंत पोहचवण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ झाल्याने आनंदी रहाल. संततीविषयी चिंता मिटेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. धैर्य आणी संयम राखा. शुभप्रद घटना घडतील. लाभदायक दिनमान असेल.

कर्क

नोकरीत फार धोका पत्करणे सध्या तरी योग्य नाही. निर्णच चुकीचा ठरू शकतो. कर्मप्रधान रहा. बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात सफलता मिळण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेमध्ये लाभ होईल. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विरोधकापासून सावध रहा. मुलाच्या संबंधाताले प्रश्न सुटतील. चैन करण्याकडे ओढा राहिल. कौटूबिक सौख्य लाभेल. सामाजिक मान सन्मान मिळेल. आंनदी राहाल.

सिंह

वरिष्ठांकडून कमी प्रमाणात सहकार्य लाभेल. अनिश्चततेमुळे अडचणी वाढतील. व्यापारिक वाद मतभेद होण्याची शक्यता आहे. जबाबदारीची कामे संभाळून करावीत. नोकरीत नव्या कल्पना सुचत असल्या तरी त्या विशेष फायद्याच्या ठरणार नाहीत. उत्पन्नापेक्षा खर्च होईल असी स्थिती राहणार आहे. मनामध्ये कुटुंबातील सदस्याच्या प्रति चिंता निर्माण होईल. आजारपण सतावेल. वाहने सावकाश चालवा. अपघाता सारखे प्रसंग घडण्याची शक्यता आहे. दिनमान क्लेशदायक आहे.

कन्या

कौटूबिक पातळीवर संतुष्ट राहाल. नवीन मित्रमैत्रिणी भेटतील. नातेवाईकांसोबत वदविवाद टाळावेत. अनावश्यक कामासाठी वेळ वाया घालू नका. नोकरीत आपल्या कार्याचा विस्तार वाढणार आहे. व्यापारात प्रतिस्पर्ध्यावर नजर ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्ध्यामुळे हानी होण्याची शक्यता आहे. सामाजिक यशात थोरामोठ्यांचा सहभाग अपेक्षित राहील. काहींना नवीन आर्थिक प्राप्तीचा मार्ग सापडेल. शुभसंदेश ऐकायला मिळतील. न्यायालयीन कामात यश येईल.

तुला

नम्रता ठेवल्यामुळे व्यवसायात हमखाश यश लाभेल. कौटुंबिक स्थितीत सुधारणा होणार आहे. काहींना धनलाभाच्या संधी मिळतील. नवीन व्यवसायास सुरुवात करू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहिल. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजित कामात वेग येणार आहे. विरोधकांवर मात कराल. भागीदारांकडून नवीन लाभदायक प्रस्ताव येईल. प्रवासाचे नियोजन आखाल. संततीकडून मोठी बातमी ऐकायला मिळेल.

वृश्चिक

रोजगारात महत्वाची भूमिका घ्याल. अनावश्यक चिंता करू नका. फायद्याच्या बातम्या ऐकायला मिळतील. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी लाभेल. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये प्रतिकारक दिनमान आहे. घरातील समस्या दूर होतील. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभणार आहे. कुंटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या कार्यक्षेत्रात कामात गुप्तता पाळावी.शिक्षणात विद्याभ्यासात प्रगति राहिल.

धनु

भांवडासोबत वादविवाद टाळा. नातेवाईक मित्रमैत्रिणी बाबत अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन संधी आल्या तर स्वीकार करा. तणावमुक्त होऊन कार्य करा. आर्थिक बाबतीत कोणावर विसंबून राहू नये. वास्तु खरेदीविक्रीत कायदा होईल. मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंता वाढवील. कुटुंबात धार्मिक विधी मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तींकडून उपयुका सल्ला मिळेल. संततीवर लक्ष ठेवा.

मकर

जीवनात नवीन संधी निर्माण होतील. व्यापारिक स्पर्धेत यश मिळेल. व्यवसायात किंवा रोजगारात मोठे परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे. लोकप्रियता वाढणार आहे. शासनाकडून पैसा किंवा सन्मान मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभणार आहे. चांगल्या बातम्या ऐकण्यास मिळतील. चातुर्याने काम केले तर आजचा दिवस शुभ आहे. आर्थिकदृष्या अनेक मोठे प्रश्न हातावेगळे करू शकाल. प्रवासातुन लाभ होईल. परदेशगमनाची शक्यता आहे.

कुंभ

साडेसतीचा द्वितीय फेरा सुरु असला तरी तणावरहित चिंतामुक्त नवीन कार्यास आंरभ करा. यश निश्चितच लाभेल. आपला वाणीचा बुद्धीचा प्रभाव इतरावर राहिल. व्यापारात प्रतिष्ठा वाढेल. उधारी वसुल होतील. नोकरदारांच्या मनाप्रमाणे घटना घडतील. विद्यार्थी तसेच महिला वर्गास उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रीणीचे सहकार्य लाभेल. व्यापारात मोठे लाभ होतील. अपरिचित व्यक्तीकडून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कटुता निर्माण होईल असे बोलणे टाळावे.

मीन

नोकरीत प्रगतीकारक दिवस असुन नवीन चांगली संधी अथवा पदोन्नती होईल.आपण पूर्वी घेतलेल्या कष्टाचे फळ आपणास मिळेल. नविन मित्र भेटतील. दुसऱ्यावर सहज आपली छाप पडूल शकेल. ग्रहयोग अनुकूल आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना आनंदाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत स्नेह वाढेल. बेरोजगारांना रोजजाराची संधी मिळेल. स्थावर इस्टेटीपासून लाभ होईल.विद्यार्थ्याचे अभ्यासात लक्ष लागेल. व्यसनापासुन दुर रहा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.