AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कन्या राशीत 8 ते 10 मार्च 2023 या कालवधीत चंद्र मांडणार ठाण, कशी असेल स्थिती? जाणून घ्या

राशीमंडळात चंद्र हा सर्वात वेगाने भ्रमण करणारा ग्रह आहे. पृथ्वीभोवती भ्रमण करताना चंद्राची स्थिती खूप महत्त्वाची ठरते. भरती ओहोटीसाठी चंद्राची स्थिती कारणीभूत ठरते. तसेच चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे.

कन्या राशीत 8 ते 10 मार्च 2023 या कालवधीत चंद्र मांडणार ठाण, कशी असेल स्थिती? जाणून घ्या
कन्या राशीतील चंद्र गोचर फलदायी ठरणार की नाही? जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र
| Updated on: Mar 07, 2023 | 2:31 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. त्यामुळे त्याचं फळ अल्प कालासाठी असतं. मात्र असलं तरी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. कारण या काळात कधी काय घडेल सांगता येत नाही. चंद्राचा गोचर आणि कला यावर मनाची स्थिती अवलंबून असते. होळी पौर्णिमेनंतर आता कृष्ण पक्ष सुरु झाला असून फाल्गुन महिन्यातील तृतीया असल्याने चंद्राला उतरती कला सुरु झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जातकांना या काळात मनाची चलबिचल झाल्याचं अनुभव येईल. चंद्र ग्रह पहिल्या, तिसऱ्या, सहाव्या आणि दहाव्या स्थानात गोचर करत चांगली फळं देतो. तर इतर स्थानात चंद्र गोचर अडचणीचा ठरू शकतो.

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र 8 मार्च (बुधवार) 2023 रोजी सिंह राशीतून कन्या राशीत सकाळी 8:53 मिनिटांनी प्रवेश करेल. 10 मार्चपर्यंत कन्या राशीत संध्याकाळी 6:37 मिनिटांपर्यंत असेल. कन्या राशीत कोणताही ग्रह नसल्याने ग्रहासोबत युती आघाडीचा प्रश्न येत नाही. त्यामुळे चंद्र हा स्वत:ची फळ देईल.

चंद्र गोचर 8 मार्च ते 10 मार्च 2023

  • कन्या- पहिल्या स्थानात
  • सिंह- दुसऱ्या स्थानात
  • कर्क- तिसऱ्या स्थानात
  • मिथुन- चौथ्या स्थानात
  • वृषभ- पाचव्या स्थानात
  • मेष- सहाव्या स्थानात
  • मीन- सातव्या स्थानात
  • कुंभ- आठव्या स्थानात
  • मकर- नवव्या स्थानात
  • धनु- दहाव्या स्थानात
  • वृश्चिक- अकराव्या स्थानात
  • तूळ- बाराव्या स्थानात

चंद्राचं स्थान आणि त्याची फळं

चंद्रानं पहिल्या स्थानात गोचर केल्यास जातकाला चांगली बातमी मिळते. सव्वा दोन दिवसात चांगली फळं मिळतात. करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरतो. मेहनतीला अपेक्षित फळ मिळतं.

चंद्राचं तिसऱ्या स्थानातील गोचर यश मिळवून देण्यास अनुकूल असतो.तुमचा मानसन्मान या काळात वाढू शकतो. तसेच आर्थिक स्थितीतही सुधारणा दिसून येते.

चंद्राचं सहाव्या स्थानातील गोचरामुळे तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची उर्जा जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या उर्जेचा पुरेपूर वापर कराला. तुमच्या जोडीदार आणि कुटुंबासोबत तुमचे संबंध चांगले राहतील.तुमचा मित्रपरिवार या काळात वाढेल.

चंद्राचं दहाव्या स्थानात गोचर होताच चांगलं फळ मिळेल. व्यवसायातही या काळात फायदा होईल. तुमचे सहकारी तुमच्या कामावर खूश राहतील. त्यामुळे काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवन आनंददायी राहिल. या काळात नवीन लोकांशी भेटीगाठी होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.