Gemini/Cancer Rashifal Today 28 July 2021 | व्यवसायासंबंधित स्पर्धेतही काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते, कामाच्या जास्त ताणामुळे तुम्हाला थकवा आणि ऊर्जा कमी झाल्याचे जाणवेल

जुन्या नकारात्मक गोष्टींना डोईजड होऊ देऊ नका. कोणाशीही संबंध बिघडू शकतात. इतरांच्या चुकांना दोष न देता सकारात्मक रहा.

Gemini/Cancer Rashifal Today 28 July 2021 | व्यवसायासंबंधित स्पर्धेतही काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते, कामाच्या जास्त ताणामुळे तुम्हाला थकवा आणि ऊर्जा कमी झाल्याचे जाणवेल
Gemini_Cancer

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : मंगळवार 28 जुलै 2021 (Gemini/Cancer Rashifal). आज बुधावर. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. बाप्पाची कुणावर कृपा असेल. मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या बुधवारचं संपूर्ण राशीभविष्य (Gemini/Cancer Daily Horoscope Of 28 July 2021 Mithun And Kark Rashifal Today) –

मिथुन राशी (Gemini), 28 जुलै

कोणत्याही कौटुंबिक समस्येमध्ये आपल्या सल्ल्याला अधिक महत्त्व दिले जाईल. यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. घरातील वडीलधाऱ्यांबद्दलही स्वाभिमान आणि सेवाभाव कायम राहील, याची खबरदारी बाळगा.

जुन्या नकारात्मक गोष्टींना डोईजड होऊ देऊ नका. कोणाशीही संबंध बिघडू शकतात. इतरांच्या चुकांना दोष न देता सकारात्मक रहा. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कार्य केल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

कामाच्या ठिकाणी वातावरण सुधारण्यासाठी अधिक मनन आणि चिंतन करण्याची आवश्यकता आहे. व्यवसायासंबंधित स्पर्धेतही काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तथापि, समजून घेतल्यामुळे आणि योग्य निर्णय घेतल्यामुळे आपण बऱ्याच समस्यांपासून मुक्त देखील व्हाल.

प्रेमसंबंध – पती-पत्नीचा एकमेकांप्रती सहकार्याचा दृष्टिकोन परस्परसंबंधांमध्ये अधिक घनिष्टता आणेल. प्रेमसंबंधांमध्येही गोडवा येईल.

खबरदारी – कामाच्या जास्त ताणामुळे तुम्हाला थकवा आणि ऊर्जा कमी झाल्याचे जाणवेल. स्वत:साठीही थोडा वेळ काढा.

लकी रंग- लाल
लकी अक्षर – प
लकी क्रमांक – 1

कर्क राशी (Cancer), 28 जुलै

आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणि जीवनशैलीची जाणीव होईल. समाजातील आपली प्रतिमा देखील सुधारेल. आध्यात्मिक कार्यात आपली रुची वाढेल. आतापर्यंत दिर्घकाळ रखडलेली कोणतीही शासकीय कामे पूर्ण करण्याची योग्य वेळ आली आहे.

कोणत्याही प्रकारच्या पैशांच्या व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा. कदाचित तुमचा विश्वासघात होईल. तरुण आपल्या भविष्यातील कामांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मौजमजा करण्यात वेळ घालवतील. त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

कामाच्या ठिकाणी आपल्या कामाची गुणवत्ता सुधारा. व्यवसायात चांगल्या ऑर्डर प्राप्त होत राहतील. काही अडचण आल्यास घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. कार्यालयाचे वातावरण शांत राहील.

प्रेमसंबंध – घरातील समस्येबाबत जीवनसाथीबरोबर काही वाद होऊ शकतात. त्या वादाचे वेळीच निराकरण करणे गरजेचे आहे.

खबरदारी – आरोग्य ठीक असेल. परंतु सध्याच्या वातावरणामुळे निष्काळजी राहू नका.

लकी रंग – हिरवा
लकी अक्षर – अ
लकी क्रमांक – 5

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI