Weekly Horoscope, 29 मे ते जून 4, 2022: मिथुन राशींच्या लोकांना याआठवड्यात उधारीचे पैसे रिर्टन मिळणार , बाकी राशीच्या लोकांना कसा असेल हा आठवडा वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope, 29 मे  ते  जून 4, 2022: मिथुन राशींच्या लोकांना याआठवड्यात उधारीचे पैसे रिर्टन मिळणार , बाकी राशीच्या लोकांना कसा असेल हा आठवडा वाचा साप्ताहिक राशीभविष्य
29 मे ते 04 जून पर्यंतचं संपूर्ण साप्ताहिक राशीभविष्य
Image Credit source: TV9 Marathi

Weekly Horoscope, मे 29 ते 4 जून 2022: मिथुन राशींच्या लोकांना लोकांनी उधार घेतलेले पैसे परत मिळतील, तर वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, जाणून घ्या इतर राशींच्या लोकांना कसा असेल हा आठवडा.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 29, 2022 | 5:00 AM

डॉ. अजय भाम्बी – Weekly Horoscope 29 May 2022 to 04 June 2022| येणारा आठवडा (Week) कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ (Lucky)असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा टाळू शकता. यावेळी कोणत्या गोष्टींबद्दल आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. या आठवड्यात आपल्यासाठी कोणता रंग (Colour), कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर शुभ आहे, हे देखील जाणून घेऊ. जाणून घ्या या आठवड्याचं म्हणजेच 29 मे ते 04 जून पर्यंतचं संपूर्ण साप्ताहिक राशीभविष्य ( Weekly Horoscope Of All Zodiac Signs Rashifal From 29 May 2022 to 04 June 2022)

मेष (Aries) –

ह्या आठवड्यात तुम्ही बिझी असाल पण, बिझी असूनही, तुम्हाला घरातील कुटुंबियांच्या आनंदासाठी नक्कीच वेळ मिळेल. सुखसोयींशी संबंधित वस्तूंच्या खरेदीत वेळ जाईल.सर्व ठरवलेली कामे उत्तम प्रकारे पूर्ण करू शकाल. तुमच्यातील कोणतीही छुपी प्रतिभा लोकांसमोर उघड होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचा आदरही वाढेल.एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी एखाद्या विषयावर वाद होण्याची शक्यता आहे. काहीवेळा तुमचा उत्साही आणि उतावीळ स्वभाव तुमच्यासाठीच त्रासाचे कारण बनतो. आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये आणि मौजमजेमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो.उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्याची योजना आखली असेल तर ती त्वरित अंमलात आणा, यशाचे योग कायम आहेत. पण कोणत्याही प्रकारचे पेपर वर्क करताना निष्काळजी राहू नका. नोकरदारांसाठीही परिस्थिती अनुकूल आहे.उच्च अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध फायदेशीर ठरतील.

वृषभ राश‍ी (Taurus)-

मुलांचे कोणतेही यश तुम्हाला मन शांती आणि आनंद मिळवून देईल. दैनंदिन कामां व्यतिरिक्त, आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीची अधिक माहिती घेण्यासाठी वेळ घालवाल. आणि अध्यात्माशी संबंधित विषयांमध्ये विशेष रुची निर्माण होईल. जुणे काही विषय असतील. तरी कोणाच्यातरी मध्यस्थीने परिस्थिती नीट सोडवता येईल. गुंतवणुकीशी संबंधित कामासाठी वेळ अनुकूल आहे.तुमच्या वागण्यामुळे किंवा कोणत्याही हट्टीपणामुळे आईच्या नातेवाईकांशी संबंध खराब होऊ शकतात. सावधगिरी बाळगा कारण तुमची काही सिक्रेट्स देखील सार्वजनिक होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी घरातील वरिष्ठांचा सल्ला घ्या. धार्मिक पुस्तकांचा अभ्यास करून किंवा कोणत्याही धार्मिक स्थळी वेळ घालवून मानसिक शांती मिळेल.विमा, शेअर्स इत्यादींशी संबंधित व्यावसायिक कामात लोक आज खूप व्यस्त राहतील. आणि उत्कृष्ट नफा कमावतील. जर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी काही बदल करण्याचा विचार करत असाल तर वास्तू सुधारणेशी संबंधित नियमांचे अवश्य पालन करा, असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदार लोकांसाठी कार्यालयात काही उत्तम परिस्थिती असेल.

मिथुन राश‍ी (Gemini)-

उधार किंवा अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते वसूल करण्याकडे विशेष लक्ष द्या. आठवड्याच्या मध्यानंतर नातेवाईक किंवा शेजाऱ्यांशी एखाद्या महत्वाच्या आणि गंभीर विषयावर चर्चा होऊ शकते. या चर्चेत तुम्ही मांडलेली भक्कम बाजू तुमचा आदर वाढवेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद पाठीशी खंबीर आहे, तो आधार कुटुंबावर कायम राहील.उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये, कारण यावेळी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने आज नुकसान होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. यावेळी फारसे समाजका्र्य न केलेलेच बरे. व्यवहाराशी संबंधित कोणतीही प्रकरणे काळजीपूर्वक हाताळा.ह्या आठवड्यात भरपूर कामं होतील. पण घाई करण्याऐवजी गांभीर्याने आणि काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांसोबतचे संबंध बिघडू देऊ नका, अन्यथा कामाचा वेग मंदावू शकतो. नोकरदारांनीही आपले काम चोखपणे करावे. अन्यथा वरिष्ठांची नाराजी तुम्हाला सहन करावी लागू शकते.

कर्क राश‍ी (Cancer)-

तुमचे कोणतेही वैयक्तिक काम यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे आत्मविश्वास आणि मनोबल वाढेल. कौटुंबिक सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यात आणि खरेदी इत्यादीमध्ये वेळ जाईल. रोजच्या धकाधकीच्या दिनचर्येतून थोडा वेळ विश्रांती आणि मौजमजेतही निघून जाईल.या आठवड्यात नातेवाईकांचेही घरी आगमन होईल. काही लोक मत्सराच्या भावनेने तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी तुमच्याविरुद्ध अफवा पसरवू शकतात. तुमच्या विषयी खोट्या गोष्टी बोलू शकतात. अशा लोकांपासून सावध रहा. विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते. ते बाहेरच्या गोष्टीत ज्या अजिबात गरजेच्या नाहीत अशा गोष्टीत अधिक लक्ष केंद्रित करतील. लक्षात ठेवा की एखाद्यावर खूप लवकर विश्वास ठेवणे किंवा भावनिक होऊन वाहून जाणे अशाने फसवणूक होऊ शकते. आठवड्याच्या मध्यानंतर लाभदायक परिस्थिती निर्माण होत आहे, त्यामुळे आपली महत्त्वाची कामे आठवड्याच्या सुरुवातीलाच पूर्ण करण्याचे नियोजन करा. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना फायदेशीर सौदे मिळू शकतात. ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांशी काही विशेष कामाच्या संदर्भात चर्चा होईल. पण पैश्यांशी संबंधित कामे काळजीपूर्वक करा.

सिंह राश‍ी (Leo)-

अनेक नवीन गोष्टी जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. पैसे येत असल्याने दिलासा मिळेल आणि आर्थिक स्थितीही चांगली राहील. धार्मिक संस्थांमध्ये समाज सेवेशी संबंधित कामात तुमचे विशेष योगदान राहील. सामाजिक वर्तुळही वाढेल, अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्तता राहील. वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची रिस्क घेणे टाळा. सकारात्मक राहा. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे सावध रहा. एखाद्या विषयावर निर्णय घेताना घरातील अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसायात वेळेत नफ्यापेक्षा मेहनत जास्त असेल. मात्र इंपोर्ट-एक्सपोर्ट संबंधित व्यवसायात विशेष कॉन्ट्रॉक्ट मिळेल. कोणत्याही प्रकारचे व्यवसायीक लोन घेऊ नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. सध्याच्या परिस्थितीमुळे सरकारी नोकरीत कामाचा ताण जास्त असेल.

कन्या राश‍ी (Virgo)-

उधार दिलेले किंवा कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची चांगली शक्यता आहे. काही काळापासून सुरू असलेल्या कोणत्याही समस्येच्या निराकरणामुळे तुम्हाला तणावमुक्त वाटेल. जवळचे नातेवाईक आणि मित्रांसोबत आनंदात वेळ जाईल. आणि कोणत्याही विशिष्ट विषयावर त्यांच्याशी चर्चाही होणार आहे. पण हे लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्या कोणत्याही नकारात्मक बोलण्यामुळे काही लोकांशी संबंध बिघडू शकतात. म्हणून, आपल्या स्वभावात साधेपणा आणि सौम्यता राखणे फार महत्वाचे आहे. कुटुंबातील सदस्यांच्या बाबतीत अवाजवी हस्तक्षेप करू नका. मुलाच्या प्रवेशाबाबत चिंता असू शकते. व्यवसायात कामाचा ताण वाढेल. जास्त प्रयत्न आणि कमी परिणाम साध्य होतील. आता जास्त फायद्याची अपेक्षा करू नका. व्यवसायाच्या फायली आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवा.नोकर करणाऱ्यांना आणि व्यावसायिकांना वेळेवर काम पूर्ण न केल्यामुळे उच्च अधिकाऱ्यांची नाराजी सहन करावी लागेल.

तूळ राश‍ी (Libra)-

तुमच्या सकारात्मक आणि सहकार्याच्या वागणुकीमुळे तुम्हाला कुटुंबात आणि समाजात विशेष मान सन्मान मिळेल. जमिनीशी संबंधित कोणतीही वादग्रस्त समस्या असल्यास अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने सोडवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. दूरच्या नातेवाइकांशी संबंध चांगले प्रस्थापित होतील, तसेच आपापसातील प्रेमही वाढेल. चुकीचा सल्ला दिल्याने तुमची बदनामी होऊ शकते. पैशाचे व्यवहार करताना खूप काळजी घ्यावी लागेल. एखाद्याची दिशाभूल करून तुम्ही स्वतःचे नुकसान करू शकता. त्यामुळे इतरांवर विश्वास ठेवण्याऐवजी तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. या आठवड्यात तुम्हाला नवीन व्यवसायाचा कॉन्ट्रॉक्ट मिळण्याची शक्यता आहे. तुमचा अधिक वेळ मार्केटिंग आणि प्रोडक्टची गुणवत्ता सुधारण्यात घालवा. नोकरदार लोकांचे त्यांच्या बॉस आणि उच्च अधिकार्‍यांशी संबंध अधिक चांगले होतील. आणि कोणताही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योग्य सहकार्यही मिळेल.

वृश्चिक राश‍ी (Scorpio)-

आठवडाभर ग्रहांची स्थिती आणि नशीब पूर्णपणे तुमच्या अनुकूल आहेत. तुम्ही चमत्कारिकरित्या काहीतरी साध्य कराल. भविष्यातील कोणतेही ध्येय देखील साध्य केले जाईल. तुमच्यातील आत्मसन्मान आणि आत्मविश्वासही वाढेल. घरातील व्यवस्थेत बदल करण्याचे नियोजन केले जाईल. तुमच्या वैयक्तिक कामां व्यतिरिक्त सामाजिक कार्यातही लक्ष देणे गरजेचे आहे. एखाद्याच्या बोलण्यात अडकून तुम्ही स्वतःचे नुकसान करू शकता हे लक्षात ठेवा. दिनचर्या व्यवस्थित ठेवा. दिवसभरातील कामांची रूपरेषा तयार करून काम करा, जेणेकरून सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. इतरांवर जास्त शिस्त ठेवण्याऐवजी, आपल्या विचारांमध्ये रहा. व्यवसायातील बदलाशी संबंधित योजनांवर काम सुरू करा. दरम्यान काही समस्या उद्भवू शकतात, परंतु आपण आपल्या समज आणि क्षमतेने समस्यांचे निराकरण देखील करू शकाल. पार्टनरशीप योजनांचा गांभीर्याने विचार करा. नोकरदारांनी आपल्या कामात अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

धनु राश‍ी (Sagittarius)-

तुमच्या कामाचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील. त्यामुळे तुमची कामे पूर्ण मेहनतीने पूर्ण करा. काही काळ सामाजिक कार्यातही जाईल. अनेक नवीन माहितीही उपलब्ध होणार आहे. जमिनीशी संबंधित कोणतीही खरेदी आणि विक्री देखील पूर्ण केली जाऊ शकते. विद्यार्थी आणि तरुणांनी त्यांच्या ध्येयांबाबत अधिक जागरूक असले पाहिजे. मित्रांच्या किंवा जवळच्या नातेवाईकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. हे लोक ईर्षेपोटी तुमच्याबद्दल कोणतीही चुकीची योजना किंवा अफवा पसरवू शकतात. त्यामुळे समाजात काही कलंक लागण्याचीही शक्यता आहे. आपल्या स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही व्यवसायात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे प्रयत्न करत राहा. सार्वजनिक व्यवहार आणि प्रसारमाध्यमांशी संबंधित कामांकडे अधिक लक्ष द्या. कारण काही अपमानास्पद परिस्थितीही निर्माण होऊ शकते. एक लाभदायक कामाशी संबंधित प्रवास देखील पूर्ण होईल, जो चांगल्या भविष्यासाठी मार्ग दाखवेल.

मकर राश‍ी (Capricorn)-

नातेवाईक किंवा मित्रांसोबत सुरू असलेला जुना वाद मिटल्याने दिलासा मिळेल. भूतकाळातील चुकांमधून शिकून, तुम्ही तुमचे वर्तमान आणखी चांगले करण्याचा प्रयत्न कराल. ज्यामध्ये तुम्ही यशस्वीही व्हाल. आणि अशा प्रयत्नांमुळे, लोकांशी संबंध देखील आश्चर्यकारकपणे सुधारतील. अनेक वेळा तुम्ही काल्पनिक योजना बनवता त्यामुळे तुमचे काम बिघडते.स्वभावात अहंकार निर्माण होऊ देऊ नका. वरिष्ठ आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य तुमचे मनोबल आणखी वाढवेल. निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका. तुमची मेहनत आणि व्यवसायात नफा अशी स्थिती सध्या कमी राहील. कार्यरत प्रणाली सुधारण्यासाठी, निश्चितपणे अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. भागीदारीशी संबंधित कामांमध्ये लाभदायक परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे परस्पर संबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा. कामाचा विस्तार करण्यासाठीही नियोजन केले जाणार आहे. नोकरदार लोकांवर कामाचा जास्त ताण राहील.

कुंभ राश‍ी (Aquarius)-

तुमचा काही प्रभावशाली लोकांशी संपर्क होईल. आणि सामाजिक स्तरावरही तुम्हाला ओळख मिळेल. अचानक काही महत्त्वाच्या बातम्या मिळतील. ज्याद्वारे तुम्ही स्वतःला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत समजाल. वेळ आणि नशिब तुम्हाला खूप मदत करते. तुमची कार्ये पूर्ण करण्यासाठी तुमची पूर्ण क्षमता आणि मेहनत लावा, नक्कीच यश मिळेल. आपली कर्तबागारी जास्त दाखवू नका. राग आणि घाई यांसारख्या स्वभावावर नियंत्रण ठेवा. नातेवाईक किंवा शेजाऱ्याशी वाद सारखी परिस्थिती उद्भवू शकते. स्वतःच्या कामात बिझी राहणं चांगलं. संयम आणि धीर धरा आणि शांत रहा. इतरांच्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करा. प्रोडक्शन संबंधित कामात घट झाल्यामुळे व्यवसायात तणाव असू शकतो. मार्केटिंग आणि संपर्क तयार करण्यात आपला अधिक वेळ घालवा. काही पेमेंट आल्याने आर्थिक परिस्थिती चांगली होईल. नोकरीत ऑफिसमध्ये काही प्रकारचे राजकारण होऊ शकते, त्यामुळे सावध राहा. आणि आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करा.

मीन राश‍ी (Pisces) –

धार्मिक आणि सामाजिक कार्यात बराच वेळ जाईल. आणि सामाजिक वर्तुळही वाढेल. संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर देखील ठरतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मुलांची अभ्यासात प्रगती पाहून मन प्रसन्न राहील. जवळचे नातेवाईक घरी येतील त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपली कार्य क्षमता आणि आत्मशक्ती वाढवणे अधिक गरजेचं आणि यावेळी योग्य आहे. घरातील ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांचा सल्ला अवश्यक घ्या, यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. काही लोक तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत करू शकतात. काही लोकांपासून अंतर राखणे आवश्यक आहे. या आठवड्यात व्यवसायाच्या कामात खूप घाई होईल. पण आठवड्याच्या मध्यानंतर तुमची कामेही पूर्ण होऊ लागतील. इंपोर्ट-एक्सपोर्ट संबंधित व्यवसायात सुधारणा होईल. कराशी संबंधित कोणतेही काम पुढे ढकलण्याऐवजी ते त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सरकारी नोकरी करणाऱ्यांनी तुमच्या कामाबद्दल अधिक जागरूक राहा, कारण तक्रार येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा. )

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें