AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एप्रिल महिन्यात राशीचक्रात मोठी उलथापालथ, गुरू ग्रहाच्या गोचरासोबत दोन शुभ योग

गुरु ग्रह जवळपास 13 महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रवेशामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम दिसून येतो. यावेळी दोन योगांची स्थिती आहे.

एप्रिल महिन्यात राशीचक्रात मोठी उलथापालथ, गुरू ग्रहाच्या गोचरासोबत दोन शुभ योग
एप्रिल महिन्यात राशीचक्रातील सर्वात मोठा ग्रहाचे मार्गक्रमण, युती आघाडीसह बरंच काही बदलणार
| Updated on: Apr 21, 2023 | 2:02 PM
Share

मुंबई : राशीचक्रात ग्रहांचं गोचर होत असतं. काही ग्रह वेगाने राशी बदल करतात. तर काही ग्रह दीर्घ कालावधीसाठी एका राशीत ठाण मांडून असतात. शनि, राहु-केतु आणि गुरु हे ग्रह एका राशीत जास्त वेळ ठाण मांडून असतात. त्यामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होतो. त्यात ग्रहांच्या युती आघाड्यांमुळे परिणाम होतो तो वेगळा. 17 जानेवारीला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करत अडीच वर्षांसाठी ठाण मांडून बसले आहेत. राहु मेष राशीत, तर केतु तूळ राशीत आहे. त्यात आता देवांचे गुरू बृहस्पती मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहेत. 22 एप्रिल 2023 रोजी हे मार्गक्रमण होणार आहे.

विशेष म्हणजे याच दिवशी चंद्र मेष राशीत असल्याने गुरुच्या आगमनाने गजलक्ष्मी योग तयार होणार आहे.तसेच सूर्य आणि गुरुच्या युतीमुळे नवम-पंचम योग आणि बुध-सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. त्यामुळे राशीचक्रातील 12 राशींबर या स्थितीचा परिणाम होणार आहे. काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ फळं भोगावी लागतील.

मेष : 22 एप्रिल रोजी गुरु ग्रह मीन राशीतून याच राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीसाठी सर्वात उत्तम काळ असणार आहे. कारण गुरु एन्ट्री मारताच गजलक्ष्मी योग तयार करणार आहे. या दरम्यान राहु, सूर्य, गुरु आणि बुध या राशीच्या पहिल्या स्थानात असणार आहेत. त्यामुळे चतुर्ग्रही योगामुळे जातकांना फायदा होईल. प्रत्येक क्षेत्रात यश आणि मानसन्मान मिळेल.कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा चांगलं इन्क्रिमेंट होऊ शकतं.

मिथुन : या राशीच्या अकराव्या स्थानात राहु, सूर्य, बुध आणि गुरुची युती होत आहे. त्यामुले या राशीच्या जातकांना याचा लाभ मिळेल. उद्योग धंद्यात अपेक्षित यश मिळेल.तसेच अपेक्षेपेक्षा जास्त पैसा हातात खेळता राहील. या कालावधीत केलेली गुंतवणूक फलदायी ठरेल. दूरचा प्रवास करण्याचा योग जुळून येईल. तसेच दीर्घ काळापासून अडकलेली कामं मार्गस्थ लागतील.

मकर : या राशीच्या चतुर्थ स्थानात चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. यामुळे जातकाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या बळ मिळेल. साडेसातीचा शेवटचा सुरु असून थोडा दिलासा मिळेल. या कालावधीत वाहन किंवा जमीन खरेदीचा योग जुळून येईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.

सिंह : या राशीच्या नवव्या स्थानात चार ग्रह एकत्र येणार आहेत. भाग्य भावात हा योग जुळून येत असल्याने नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रत्येक कामात झटपट यश मिळताना दिसेल. अडकलेले पैसेही या कालावधीत परत मिळू शकतात. कर्जाचा बोजाही हलका होईल आणि कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मीन : या राशीच्या दुसऱ्या म्हणजे धनभावात चार ग्रहांची युती होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना आर्थिक लाभ होईल. आरोग्यविषयक समस्या दूर होतील. तसेच करिअरमध्ये प्रगती होताना दिसून येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.