Holi 2025 Astrology : होलिका दहन होताच चमकेल ‘या’ दोन राशींचे नशीब! तयार होईल राजयोग
Holi Gajkesari RajYog : आज सर्वत्र होळीचा सण साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रात आजच्या दिवसाला महत्व आहे. आज गुरु आणि चंद्राची युती होत असल्याने गजकेसरी राजयोग बनत आहे. याचा फायदा काही राशींना होणार आहे.

हिंदू कॅलेंडरनुसार, आज होळीचा पवित्र सण केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आज होळी चंद्रग्रहणाच्या सावलीत असेल. तथापि, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. पण चंद्रग्रहणाचा परिणाम होळीवर होईल. या होळीला काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येणार आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार होळीला गजकेसरी योग तयार होत आहे. होळीच्या दिवशी या योगामुळे कोणत्या राशींना शुभफळ मिळणार आहे ते जाणून घेऊया.
काय असतो गजकेसरी राज योग..
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, गजकेसरी योग हा अतिशय शुभ आणि राजयोग मानला जातो. जेव्हा जेव्हा गुरु आणि चंद्राची युती होते तेव्हा गजकेसरी योग बनतो. यामुळे आर्थिक बळकटी, करिअरमध्ये वाढ आणि सौभाग्य प्राप्त होते. यासाठी हा योग शुभ मानला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी, गुरु ग्रह वृषभ राशीत असेल आणि चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल. जेव्हा देवगुरू गुरू पाचव्या दृष्टीने चंद्र पाहतील, तेव्हा मिथुन राशीच्या चौथ्या घरात आणि मकर राशीच्या भाग्य घरात गजकेशरी योग तयार होईल. या दोन्ही राशींच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप शुभ राहणार आहे.