Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology 2025 : इकडे मार्च संपला, तिकडे नशिबाचं दार उघडलं! हाती घेतलेल्या प्रत्येक कामात ‘या’ पाच राशींना येईल यश

Astrology Updates After March 2025 : या वर्षात होणाऱ्या ग्रहांच्या स्थितीतील बदलांमुळे 2025मध्ये अनेक राशींचं नशीब पालटणार आहे. याची सुरुवात मार्च संपताच होईल. अनेक वर्षांपासून अच्छे दिनच्या प्रतीक्षेत असलेल्या पाच राशींकहा सुवर्णकाळ आता सुरू होणार आहे.

Astrology 2025 : इकडे मार्च संपला, तिकडे नशिबाचं दार उघडलं! हाती घेतलेल्या प्रत्येक कामात 'या' पाच राशींना येईल यश
ZodiacImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 12, 2025 | 6:23 PM

2025 हे वर्ष ज्योतिषशास्त्रानुसार फार महत्वाचं मानण्यात आलेलं आहे. या वर्षात होणाऱ्या ग्रहांच्या स्थितीतील बदलांमुळे या वर्षाला महत्व प्राप्त झालेलं आहे. वर्ष सुरू होताच याचा परिणाम काही राशींना दिसायला सुरू झाला आहे. वर्षाच्या पुढच्या 9 महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाने काही राशीच्या लोकांवर संकट येणार आहे. तर काही राशींसाथी हा काळ म्हणजे सुवर्णकाळ असणार आहे.

राशी चक्रातल्या पाच राशी अशा आहेत, ज्यांना गेल्या काही दिवसांपासून सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या राशीच्या लोकांनी ठरवलेलं कोणतच काम होत नव्हतं. कष्ट, मेहनत करून देखील त्याचं फळ मात्र मिळत नसल्याने या राशीच्या लोकांच्या आयुष्यात निराशा आली होती. मात्र आता या पाच राशीच्या लोकांच्या नशिबाचं दार उघडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार  मार्च महिना संपताच ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या बदलांमुळे या पाच राशीच्या लोकांना नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध अशा सगळ्याचं गोष्टीत यश मिळणार आहे.

कोणत्या पाच राशींचं उजळेल नशीब? 

मेष रास 

नाशिबाची साथ ज्यांना मिळणार आहे, त्यातली पहिली रास ही मेष रास असणार आहे. मार्च महिना संपताच या लोकांना अनेक नवीन संधी चालून येतील. नोकरदार वर्गाला पदोन्नती मिळू शकते. गुंतवणूक करणार असाल, मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर त्यात देखील तुम्हाला फायदा मिळू शकतो. व्यावसायिकांना एखाद्या सौद्यात मोठा नफा होईल. इतके दिवस जाणवणारी आर्थिक चणचण संपेल. अर्थ प्राप्तीचे नवे स्त्रोत तयार होतील. या काळात दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवणं हिताचं ठरेल. नव्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या.

सिंह रास

कला, प्रसारमाध्यमे आणि नेतृत्व क्षेत्रांत काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळणार आहे. कीर्ती आणि ओळख निर्माण करणारा हा काळ ठरेल. तुम्ही कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात असाल तर तुमची ओळख वाढेल आणि तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी बढती, प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. नव्या गोष्टी करून पाहण्याचं धाडस करण्यास हा काळ उत्तम आहे.

वृश्चिक रास 

मार्चनंतर या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदी आनंद असेल. नोकरी व्यवसाय आणि खासगी आयुष्याला झळाळी मिळताना दिसेल. आर्थिक लाभ होतील. तसंच काही दीर्घकालीन गुंतवणूक केलेली असेल तर त्याचा देखील चांगला परतावा या काळात तुम्हाला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज होईल. प्रगती होणार असली तरी काही अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुम्ही नक्की घ्या. प्रदेशवारीचा विचार असेल तर काळ अनुकूल असेल.

धनू रास 

तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला मार्च 2025 नंतर मोठा ब्रेक मिळू शकतो. यावेळी नवीन व्यवहार आणि भागीदारी फायदेशीर ठरतील. अनावश्यक खर्च मात्र टाळा. नोकरीच्या ठिकाणी बढतीची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली जाईल. घरातील वातावरण देखील आनंदाचे असेल. जोडीदाराशी मधुर संबंध तयार होतील. जुने वाद या काळात मिटतील. एकूणच चांगल्या कर्माची फळं मिळण्याचा हा काळ असणार आहे.

मकर रास 

29 मार्च 2025 ला मकर राशीची साडेसाती संपणार आहे. त्यामुळे 7.5 वर्ष सहन सहन केलेल्या गोष्टींचा परतावा आता तुम्हाला मिळेल. उत्तम नोकरी आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याचा हा काळ असेल. साडेसातीच्या काळात शनिदेवाने तुम्हाला अनेक अडचणी आल्या. आता त्या अडचणी चुटकीसरशी दूर होताना आपण बघाल. गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळेल आणि तुम्ही भविष्यातील योजनांसाठी पैसे गोळा करू शकाल.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.