Surya Grahan 2025 : मार्च ऐंडला ‘या’ तीन राशींचं टेंशन वाढवणार; नोकरी, प्रेम आणि करिअरला लागणार ग्रहण
Surya Grahan Effect On Zodiac Signs : मार्च महिन्याच्या अखेरीस या वर्षाचं पहिलं सूर्य ग्रहण लागणार आहे. हा काळ काही राशींना अनुकूल ठरणार आहे. तर काही राशींसाठी हे ग्रहण दिवाळं काढणारं असणार आहे. तुमच्या राशीवर या सूर्य ग्रहणाचा नेमका काय परिणाम होणार? जाणून घेऊया..

यंदाच्या वर्षीच पहिलं सूर्यग्रहण मार्च महिन्यात 29 तारखेला लागणार आहे. शनिवारी येणाऱ्या या सूर्य ग्राहणामुळे काही राशींना फायदा होणार आहे. तर काही राशींवर याचा वाईट परिणाम होताना दिसणार आहे. प्रेमसंबंध, करिअर, नोकरीत या राशींना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. एकीकडे मकर राशीची साडेसाती संपणार आहे. तर दुसरीकडे काही राशींना हा काळ समस्यांनी भरलेला असणार आहे. त्यामुळे अडचणींचं ग्रहणच या राशीच्या लोकांना लागणार आहे.
शनिवारी 29 मार्च 2025 रोजी दुपारी 2.20 मिनिटांनी सूर्य ग्रहण लागणार आहे. तर संध्याकाळी 6.16 मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे. म्हणजे एकूण 2 तास 53 मिनिटांचं हे ग्रहण असणार आहे. या काळात ज्योतिषशास्त्रानुसार तीन राशींच्या आयुष्यात चांगलीच उलथापालथ होणार आहे. या राशींना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
सूर्यग्रहणाचा परिणाम होणाऱ्या राशी कोणत्या..
मेष रास
मेष राशीच्या लोकांवर सूर्य ग्रहणाचा वाईट परिणाम होणार आहे. या काळात मेष राशीच्या लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जॉब आणि करिअरमध्ये देखील समस्या येऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागेल. प्रेमात असलेल्यांना जोडीदाराशी वाद झाल्याने नातेसंबंधांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुद्धा वाद निर्माण होऊ शकतात.
कर्क रास
वर्षाच्या पहिल्याच सूर्यग्रहणानंतर कर्क राशीच्या लोकांच्या करिअर आणि नोकरीत अडचणी येण्याची शक्यता आहे. व्यवसायात व्यवहार जपून करावे. पैसे अडकून पडू शकतात. त्यामुळे तुम्ही चिंतेत राहाल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी मधुर संबंध ठेवण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही वादात अडकू नका.
मीन रास
या राशीच्या लोकांना सूर्यग्रहण काळात अनेक अडचणीना तोंड द्यावं लागेल. ज्यामुळे चिडचिड होईल. डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत वरिष्ठांशी संबंध बिघडू शकतात. विवाहेच्छुकांचे विवाह जुळण्यात अडचणी येतील. ताक देखील फुंकुन प्यावे अशी स्थिती नात्यात असेल. घाई करू नका.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
