AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2025 Astrology: सावधान! होळीनंतर ‘या’ ३ राशींचे होणार नुकसान, राहू-केतू भारी पडणार

Holi 2025 Astrology: होळी हा सण झाल्यानंतर राहू, केतू आणि शनीचे संक्रमण होणार आहे. त्यामुळे तीन राशींवर याचा अशुभ प्रभाव पडणार आहे. कोणत्या राशींना याचे नुकसान होणार?

Holi 2025 Astrology: सावधान! होळीनंतर 'या' ३ राशींचे होणार नुकसान, राहू-केतू भारी पडणार
ZodiacImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 10, 2025 | 7:30 PM
Share

होळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हा सण साजरा करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. भारतात होळी या सणाला प्रचंड महत्त्व आहे. तसेच ज्योतिषशास्त्रातही या सणाला तितकेच महत्त्व आहे. पंचांगानुसार, होळी हा सण यावर्षी १४ मार्च २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानंतर तीन ग्रहांचे भ्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, होळीनंतर राहू, केतू आणि शनीच्या चालीमध्ये नेमके काय बदणार होणार? त्यामुळे कोणत्या राशींचे नुकसान होणार चला जाणून घेऊया…

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू- केतू आणि शनीच्या संक्रमणाचा मोठा परिणाम हा वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनावर होणार आहे. या राशीच्या लोकांवर हा अशुभ प्रभाव असणार आहे. त्यांच्या प्रेममय जीवनात मोठे अडथळे निर्माण होणार आहेत. या राशीच्या लोकांचे मूड हे थोडे वाईट असणार आहेत. वृषभ राशीच्या तरुणांमध्ये मानसिक तणाव वाढणार आहे. तसेच करिअर बाबत चिंता निर्माण होईले. ज्या लोकांचे वय हे ६० ते ८० वर्षे आहे त्यांना पोटदुखीचे आजार सुरु होतील.

धनु

धनु राशीच्या लोकांना देखील होळीनंतर राहू, केतू आणि शनीच्या चालीतील बदलामुळे समस्या निर्माण होणार आहेत. या राशीचे लोक जर करिअरमध्ये प्रगती करण्याची इच्छा बाळगून असतील तर ती पूर्ण होणार नाही. त्यांचे मन अस्वस्थ राहील. व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अचानक कर्ज घेण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते. जर तुम्ही गेल्या वर्षी एखाद्या मोठ्या कंपनीत गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता नाही.

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ आणि धनू या दोन राशींना त्रास होणारच आहे त्यासोबतच कुंभ राशीच्या लोकांवर देखील राहू, केतू आणि शनीच्या संक्रमणाचा वाईट प्रभाव पडणार आहे. त्यांच्या जीवनात नकारात्मकता निर्माण होणार आहे. तसेच प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे कारण गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. वाहने चालवताना काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्या लोकांचे सहकाऱ्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम कार्यकयीन कामकाजावरही होणार. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.