AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope 12th March: ‘या’ राशीच्या व्यक्तींना आज होणार धनलाभ; मोठी गुंतवणूक करण्यासाठी उत्तम मुहूर्त

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | Horoscope 12th March

Horoscope 12th March: 'या' राशीच्या व्यक्तींना आज होणार धनलाभ; मोठी गुंतवणूक करण्यासाठी उत्तम मुहूर्त
| Updated on: Mar 12, 2021 | 7:33 AM
Share

मेष: हितशत्रुंपासून सावध राहा. एखाद्या गोष्टीचा खूप विचार करु नका, नियोजित कार्य ठरल्याप्रमाणे पार पडतील. जुनी येणी वसूल होतील. फिरायला जाण्याचा योग संभवतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत करावी लागेल. मोठे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या, तात्काळ कोणावरही विश्वास टाकू नका.

वृषभ: आर्थिक आवक होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी कार्यशैलीमध्ये बदल करावा लागेल. तणाव दूर होईल. तरुणांना नोकरी मिळू शकते. जोखीम घेणे टाळा. एखादे कार्य पूर्ण झाल्यावर आपण आनंदी व्हाल. विवाहित जीवनातील गोडवा वाढेल.

मिथुन: आज आपल्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते. समाजात तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. विरोधकांपासून सावध रहा. व्यवसायिकांना फायदा होईल. वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्याबद्दल विचार करता येतो. विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. तब्येत सुधारेल. तणाव दूर होईल. आनंदी राहाल पण उधळपट्टी होणार नाही याची दक्षता घ्या.

कर्क: आज पैशाची परिस्थिती चांगली राहील. कार्यालयात सामान्य वातावरण असेल. आपण आपल्या जोडीदारासह फिरायला जाऊ शकता. थकबाकीचे पैसे परत मिळण्याचा योग. वृद्धांना आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. काही कामाच्या संबंधात प्रवासाला जावे लागेल. खाण्यापिण्याची काळजी घ्या.

सिंह: नवीन काम सुरु करण्यासाठी चांगला दिवस. आर्थिक परिस्थिती सुधारेल. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात सामंजस्य राहील. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आजची दिवस चांगली सुरुवात होईल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. अज्ञात लोकांवर विश्वास ठेवू नका. नोकरदार माणसांची बदली होऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील.

कन्या: आज विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. कोणाशी वाद होऊ शकतो. तणावात असल्यास आपल्या आरोग्याबद्दल काळजी घ्या. कोठेही प्रवास करू नका. जोखीम घेऊ नका आज जबाबदारी वाढेल. अचानक नवे खर्च येतील. सरकारी कामकाज पुढे जाईल. व्यवसायात प्रगती होईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. वैवाहिक जीवन सुखद असेल.

तूळ: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आर्थिक लाभासाठी संधी उदयास येतील. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील. कर्मचार्‍यांना बढती मिळू शकते. सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. नातेवाईकांशी चांगले वागा, आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक: आज आत्मविश्वास आणि सकारात्मकता ठेवा. नशीब तुम्हाला साथ देईल. तब्येत सुधारेल. वाहन किंवा जमीन खरेदी करू शकता. तुम्हाला प्रगतीची नवी दारे उघडतील. कोणतेही काम पूर्ण करण्यात आळस करु नका. शत्रूंच्या अडथळ्यामुळे समस्या उद्भवू शकतात. गरजू लोकांना मदत कराल.

धनु: आज रखडलेले काम पूर्ण होईल. अविवाहित लोकांसाठी नातं पुढे जाईल. जोखीम घेऊ नका तब्येत ठीक होईल आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्हाला चांगली माहिती मिळेल. जर आपण नवीन घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला आहे. तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायात प्रगती होईल. आपल्या सल्ल्यानुसार बर्‍याच लोकांचे काम पूर्ण होईल.

मकर: आज आपण काही नवीन कामे करू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये रस असेल. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. एखाद्या नातेवाईकाशी मतभेद होण्याची शक्यता आहे. अभ्यासाची आवड जागृत होईल. एखाद्या नात्याला भेटू शकतो. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन गोड असेल. आजचा दिवस एक सकारात्मक दिवस असेल. थांबलेली कामे पूर्ण केली जातील.

कुंभ: नोकरीच्या ठिकाणी एखादा पेचप्रसंग उद्भवू शकतो. आर्थिक परिस्थिती सुधारेल. खाण्यापिण्याची काळजी घ्या. अज्ञात लोकांवर विश्वास ठेवू नका. वृद्धांची काळजी घ्या. वाहन काळजीपूर्वक चालवा. चुकीच्या गोष्टींपासून दूर रहा.

मीन: उसनावारीच्या पैशांवरुन वाद उद्भवू शकतो. आजचा दिवस तणावात जाईल. आरोग्य चांगले राहणार नाही. एखाद्या गोष्टीमुळे चिडचिड होईल. अज्ञात लोकांसमोर गोपनीय चर्चा करू नका. आपल्यावर खूप जबाबदारी येईल.

(Horoscope 12th March Astrology horoscope reading)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.