AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुलैमध्ये होणार विध्वंस, काउंटडाउन सुरू झालं? नव्या बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमुळे जगात दहशत!

नव्या बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमध्ये जुलै महिन्यात मोठे संकट येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे १० दिवसात काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जुलैमध्ये होणार विध्वंस, काउंटडाउन सुरू झालं? नव्या बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमुळे जगात दहशत!
New Baba VangaImage Credit source: AI Image
| Updated on: Jun 19, 2025 | 12:37 PM
Share

जुलै 2025 येण्यापूर्वीच जपानसह संपूर्ण जगात एक विचित्र भीती पसरली आहे. यामागचं कारण आहे एक रहस्यमयी जपानी मंगा कलाकार रयो तत्सुकी. त्यांच्या ‘The Future I Saw’ या पुस्तकातील धक्कादायक भविष्यवाणीमुळे सध्या जगभरात खळबळ माजली आहे. लोक आता रयो तत्सुकी यांना नवीन ‘बाबा वेंगा’ (प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्त्या) म्हणू लागले आहेत. कारण, या मंगा कलाकाराच्या अनेक जुन्या भविष्यवाण्या (Ryo Tatsuki Predictions) खऱ्या ठरल्या आहेत. त्यांच्या पुस्तकातील दाव्यांनुसार, पुढील महिन्यात 5 जुलैला जपानमध्ये एक भयानक आपत्ती येणार आहे, ज्यामध्ये सुनामीच्या लाटा तीनपट उंचीवर पोहोचू शकतात.

जपानी मंगा कलाकाराच्या या भीतीदायक भविष्यवाणीने सोशल मीडियावर प्रचंड गोंधळ उडाला आहे. लाखो लोक यामुळे तणावात आहेत आणि सतत यावर पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. काहीजण त्सुनामीची शक्यता व्यक्त करत आहेत, तर काहीजण म्हणतात की एक महाप्रलय येणार आहे, ज्याची मुळे जपान आणि फिलीपिन्सदरम्यान समुद्रात असलेल्या एका रहस्यमयी तड्याशी जोडली जाऊ शकतात.

वाचा: ग्रहण योगात चमकेल या 5 राशींचे नशीब! राहूही होणार मेहरबान

रयो तत्सुकी कोण आहेत?

रयो तत्सुकी स्वतःला वाईट स्वप्नांद्वारे भविष्य पाहणारे सांगतात. असं सांगितलं जातं की त्यांनी त्यांच्या ‘द फ्यूचर आय सॉ’ या पुस्तकात ज्या घटनांचा उल्लेख केला आहे, त्यापैकी अनेक खऱ्या ठरल्या आहेत. सर्वाधिक चर्चा त्यांच्या 1999 मधील भविष्यवाणीची आहे, जी मार्च 2011 मध्ये जपानमध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंप आणि त्सुनामीशी बऱ्यापैकी मिळती-जुळती होती. या नैसर्गिक आपत्तीने जपानला हादरवून सोडलं होतं. आता 5 जुलैबाबत केलेल्या त्यांच्या भविष्यवाणीमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. जरी रयो तत्सुकी यांनी त्यांच्या पुस्तकात ही आपत्ती नेमकी काय असेल हे स्पष्टपणे सांगितलं नसलं, तरी सोशल मीडिया युजर्सनी याला शक्तिशाली भूकंप आणि त्सुनामी मानलं आहे, जे महाप्रलयाचं कारण ठरू शकतात.

भविष्यवाणीचा परिणाम!

या भीतीदायक भविष्यवाणीचा परिणाम असा झाला की पर्यटकांनी जपानपासून किनारा केला आहे. ब्लूमबर्ग इंटेलीजन्सच्या अहवालानुसार, जपानसाठी जूनच्या शेवटी आणि जुलैच्या सुरुवातीला फ्लाइट बुकिंगमध्ये सर्वाधिक घट नोंदवली गेली आहे.

हाँगकाँगमधील एका ट्रॅव्हल एजन्सीचं म्हणणं आहे की, पर्यटक भीतीमुळे जपानचं नावही घ्यायला तयार नाहीत. एजन्सीचं म्हणणं आहे की, एप्रिल-मेमध्ये स्प्रिंग ब्रेकमध्येही जपानच्या बुकिंगमध्ये 50 टक्क्यांपर्यंत घट झाली होती. याशिवाय, अनेकांनी त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचं नियोजनही रद्द केलं आहे.

‘अफवांवर लक्ष देऊ नका’

दरम्यान, जपानने या भविष्यवाण्यांना पूर्णपणे बकवास ठरवलं आहे. मियागी प्रांताचे गव्हर्नर योशिहिरो मुराई यांनी सांगितलं, अफवांकडे लक्ष देऊ नका, निर्धास्तपणे जपानला या. अशा अफवांमुळे पर्यटनावर परिणाम होतो. घाबरण्याची गरज नाही, कारण जपानी लोक देश सोडून कुठेही जात नाहीत.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.