वाईट दिवसातून जात आहात? हे सात उपाय अवश्य करा
एकामागून एक संकटे येत राहतात आणि पैसा, मालमत्ता इत्यादी सर्वच संकटात सापडतात, तेव्हा शास्त्रात सांगितलेले काही उपाय फार प्रभावी ठरतात. लाल किताबचे (Lal Kitab) हे सर्व ज्योतिषीय उपाय सात्विक पद्धतीने केले जातात.

मुंबई : वाईट दिवस बरचं काही शिकवतात मात्र हे वाईट दिवस जास्त दिवस राहिले तर माणसाचे मनोबल तुटायला लागते. बरेच जण मोठ्या काळापासून वाईट दिवसांचा किंवा समस्यांचा सामना करत असतील. एकामागून एक संकटे येत राहतात आणि पैसा, मालमत्ता इत्यादी सर्वच संकटात सापडतात, तेव्हा शास्त्रात सांगितलेले काही उपाय फार प्रभावी ठरतात. लाल किताबचे (Lal Kitab) हे सर्व ज्योतिषीय उपाय सात्विक पद्धतीने केले जातात. अनेकजण याला श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विषय मानतात. पण हे उपाय केल्याने काहीही नुकसान होत नाही. जाणून घेऊया काही प्रभावी उपायांबद्दल.
हे उपाय काढतात संकटातून बाहेर
हनुमान चालीसा वाचणे : सर्वप्रथम तुम्ही नियमांसह हनुमान चालीसा वाचण्यास सुरुवात करा. संध्यावंदनासह हनुमान चालिसाचे रोज पठण करावे. संध्यावंदन सकाळी आणि संध्याकाळी घरी किंवा मंदिरात केले जाते. पवित्र मनाने आणि शांततेने हनुमान चालिसाचे पठण केल्याने आपल्याला हनुमानजीची कृपा प्राप्त होते, जी आपले सर्व प्रकारच्या ज्ञात-अज्ञात संकटांपासून संरक्षण करते. हनुमान चालीसा पठण केल्यानंतर कापूरने हनुमानजीची आरती करावी.
हनुमानजींना चोळा अर्पण करा : हनुमानजींना 5 वेळा चोळा अर्पण करा, मग तुम्हाला संकटांपासून त्वरित मुक्ती मिळेल. याशिवाय प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावून हनुमानजीच्या मंदिरात ठेवा. हे किमान 11 मंगळवार किंवा शनिवारी करा.
नारळाने दृष्ट काढा : एक पाणी घातलेले नारळ घ्या आणि ते 21 वेळा शरिरावरून उतरवा. त्यानंतर मंदिरात जा आणि तेथे हे नारळ अर्पण करा. अशाप्रकारे, संकटात सापडलेल्या कुटुंबातील सदस्याची दृष्ट काढा. हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी करावा. 5 शनिवारी असे केल्याने जीवनातील अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळेल. कोणत्याही सदस्याची तब्येत खराब असेल तर हा उपाय त्याच्यासाठी उत्तम आहे.
गाई, कुत्री, मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न द्या : झाडे, मुंग्या, पक्षी, गायी, कुत्रे, कावळे, अपंग मानव इत्यादींसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था जातकाला सर्व प्रकारे आशीर्वाद देते. त्याला ‘वैश्वदेव यज्ञ कर्म’ असे म्हटले गेले आहे, वेदांतील पंचयज्ञांपैकी एक. हा सर्वात मोठा पुण्य मानला जातो.
माशांना खाद्य द्या : कागदावर छोट्या अक्षरात राम-राम लिहा. ही नावे जास्तीत जास्त संख्येने लिहा आणि ती सर्व स्वतंत्रपणे कापा. आता पिठाचे छोटे-छोटे गोळे बनवा आणि प्रत्येकाला कागदात गुंडाळा आणि नदी किंवा तलावावर जा आणि हे गोळे मासे आणि कासवांना खायला द्या. कासवांना आणि माशांना रोज पिठाच्या गोळे करून खायला द्यावे आणि मुंग्यांना पीठ साखर मिसळून खायला द्यावे.
जल अर्पण करा : तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे लाल चंदन टाकावे. ते भांडे डोक्याखाली ठेवून रात्री झोपावे. सकाळी उठल्यानंतर प्रथम ते पाणी तुळशीला अर्पण करावे. असे काही दिवस करा. हळूहळू तुमच्या समस्या दूर होतील.
छाया दान करा : शनिवारी पितळेच्या भांड्यात मोहरीचे तेल आणि नाणे (रुपया-पैसा) ठेवा आणि त्यात आपली सावली पाहून तेल मागणाऱ्याला द्या किंवा शनिवारी शनि मंदिरात तेल दान करा. हा उपाय कमीत कमी पाच शनिवार केल्यास तुमच्या शनीची पीडा शांत होईल आणि शनिदेवाची कृपा सुरू होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
