उशिरा होते या तारखांना जन्मलेल्या लोकांचे लग्न, मिळतो लॉयल पार्टनर
अंकशास्त्रानुसार विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांना आपला जीवनसाथी निवडायला थोडा वेळ घेतात. परिणामी, त्यांचं लग्न उशिरा होते. जाणून घ्या या कोणत्या व्यक्ती आहेत.

अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की जन्मतारखेचा व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्व, करिअर, आरोग्य आणि नातेसंबंधांवर प्रभाव पडतो. अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट अंक असे आहेत, ज्यांचे लग्न इतरांपेक्षा उशिरा होते.
मात्र, जेव्हा ते आपला जोडीदार निवडतात तेव्हा ते दीर्घकाळासाठी त्यांच्यासोबत राहतात. जाणून घ्या या व्यक्ती कोण आहेत आणि त्यांचे उशिरा लग्न होण्यामागील खरे कारण.
या ३ मुलांकांच्या व्यक्तींचे होतात उशिरा लग्न
मूलांक ४
कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्य् व्यक्तींचा मूलांक ४ असतो. हा अंक राहू ग्रहाशी संबंधित आहे. अंकशास्त्रानुसार या मूलांकाचे लोक त्यांच्या जीवनातील ध्येयांबाबत बरेच क्लिअर आणि प्रॅक्टिकल असतात. पण ते लोकांवर सहजासहजी विश्वास ठेवू शकत नाही. लग्नाच्या बाबतीत त्यांना घाई केलेली आवडत नाही. त्यांना आधी आपल्या जोडीदाराला पूर्णपणे समजून घ्यायचे असते आणि त्यानंतरच ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतात. याच कारणामुळे मूलांक ४ च्या लोकांचे विवाह लांबतात. एका चांगल्या व्यक्तीची निवड केल्यानंतर ही लोक त्याची आयुष्यभर साथ देतात.
मूलांक ७
अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो. हा अंक केतू ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे या अंकाचे लोक सामान्यतः खूप शांत असतात. ते प्रत्येक गोष्टीवर खोलवर विचार करतात. कधी कधी हे अगदी लहान लहान गोष्टींवरही हे खूप ओव्हरथिंक करतात. हे लोक नात्यांच्या बाबतीत पटकन निर्णय घेऊ शकत नाही. कोणावर विश्वास ठेवायला यांना वेळ लागतो. समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेण्यासाठी यांना थोडा वेळ हवा असतो. मूलांक ७ च्या लोकांना जीवनसाथी म्हणून एक मित्र हवा असतो. त्यामुळे ते अनेकदा योग्य व्यक्ती शोधायला उशीर करतात. योग्य व्यक्ती मिळाल्यानंतर मूलांक ७ च्या लोकांचे आयुष्य पुन्हा मार्गावर येते.
मूलांक ८
कोणत्याही महिन्याच्या ८, १७, किंवा २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. हा अंक शनी ग्रहाशी संबंधित आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनीचा संबंध संयम आणि संथ गतीशी जोडला जातो. परिणामी मूलांक ८ असलेल्या लोकांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींना वेळ लागतो. जेव्हा लग्नाचा विषय येतो, तेव्हा या मूलांकाचे लोक खूप सिरीयस आणि प्रॅक्टिकल विचार करणारे असतात. ते सर्वात आधी आपल्या करिअरला प्राधान्य देतात. ते सेटल झाल्यावरच लग्नाचा विचार करतात. यामुळेच मूलांक ८ असलेल्या लोकांचे लग्न अनेकदा लांबणीवर पडतात. पण एकदा का त्यांना योग्य जोडीदार मिळाला की ते प्रत्येक पावलावर खंबीरपणे त्यांची साथ देतात.
