AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नितीश कुमार यांचा मोठा निर्णय, भाजपला हादरा, थेट या नव्या पक्षासोबत युती

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मोठं यश मिळालं होतं. राज्यात जेडीयू आणि भाजपची सत्ता आली, मात्र त्यानंतर आता नितीश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे.

मोठी बातमी! नितीश कुमार यांचा मोठा निर्णय, भाजपला हादरा, थेट या नव्या पक्षासोबत युती
Nitish KumarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 23, 2026 | 5:18 PM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मोठं यश मिळालं होतं. काँग्रेसला मोठा धक्का बसला. दरम्यान राज्यात एनडीएची सत्ता येताच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. परंतु त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 15 एप्रिल 2026 रोजी भाजप नेते सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. बिहारमध्ये सुरू असलेल्या या सर्व घडामोडींमुळे जेडीयूमध्ये नाराजीचा सूर असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रांगली. त्यानंतर बिहारमध्ये समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या मुद्द्यावर देखील नितीश कुमार यांचा पक्ष असलेला जेडीयू भाजपसोबत दिसून आला नाही. आता नितीश कुमार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.

पंजाबमध्ये पुढच्या वर्षी 2027 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या विधानसभा निवडणुकीची तयारी जेडीयूने आतापासूनच सुरू केली असून, पंजाबमध्ये जेडीयूने भाजपसोबत युती न करता थेट शिरोमणी अकाली दल श्री आनंदपूर साहिब (एसएडीएसएएस) सोबत युती केली आहे. जेडीयू हा एनडीएचा प्रमुख घटक पक्ष आहे. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचं सरकार आहे. परंतु दुसरीकडे आता पंजाबमध्ये मात्र जेडीयून मोठा निर्णय घेतला आहे. जेडीयूनं शिरोमणी अकाली दलासोबत युती केली आहे. मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार याचा हा आपला मित्र पक्ष असलेल्या भाजपसाठी पहिला धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता नितीश कुमार यांची पुढची वाटचाल कशी असणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तर दुसरीकडे सुनील दत्त यांची पुतणी आणि संजय दत्त यांची चुलत बहीण ममता दत्त यांनी देखील जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. एसएडीएसएएस आणि जेडीयूची युती झाली असून, पंजाब विधानसभेच्या सर्व जागांवर ते आपले उमेदवार उभे करणार आहेत. समविचारी पक्षांना एका मंचावर आणण्यासाठी आम्ही युती केली असल्याची माहिती यावेळी जेडीयूचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष मलविंदर सिंह बेनीपाल यांनी दिली आहे. त्यामुळे आता पंजाबमध्ये भाजपसमोर, आप, काँग्रेससह आता जेडीयूचं देखील मोठं आव्हान असणार आहे.

Follow Us
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट