AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahashivratri 2024 : या तारखेला साजरी होणार माहाशिवरात्री, अशाप्रकारे करा महादेवाची आराधना

Mahashivratri 2024 हिंदू धर्मात महाशिवरात्रीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भोलेनाथ माता पार्वतीसोबत पृथ्वीवर येतात. या दिवशी भगवान शिव आणि गौरी यांची विधिपूर्वक आणि खऱ्या मनाने पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक शुभ फल प्राप्त होतात. या दिवशी काशी, उज्जैन, हरिद्वारसह इतर शिव तीर्थक्षेत्रांवर महाशिवरात्री पूजेची विशेष शोभा असते.

Mahashivratri 2024 : या तारखेला साजरी होणार माहाशिवरात्री, अशाप्रकारे करा महादेवाची आराधना
महाशिवरात्रीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Edited By: | Updated on: Mar 06, 2024 | 11:07 AM
Share

मुंबई : भोलेनाथाचे भक्त महाशिवरात्रीची (Mahashivratri 2024) आतुरतेने वाट पाहत असतात. हा पवित्र असा दिवस आहे जेव्हा शिव आणि शक्ती युगानुयुगे एक झाले. महाशिवरात्री हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री हा पवित्र सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. महाशिवरात्रीचा हा उत्सव 8 मार्च रोजी साजरा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया शिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असेल.

महाशिवरात्री 2024 पुजेचा शुभ मुहूर्त

  • फाल्गुन महिन्याची कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी सुरू होते – 8 मार्च 2024 रात्री 9:57 पासून
  • फाल्गुन महिन्याची कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी समाप्त होईल – 9 मार्च 2024 संध्याकाळी 6:17 वाजता
  • महाशिवरात्री 2024 उपवास तारीख – 8 मार्च 2024
  • महाशिवरात्री पूजेची पहिली शुभ मुहूर्त – 8 मार्च सकाळी 5.01 ते 5.50
  • महाशिवरात्री पूजेची दुसरी शुभ वेळ – 8 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 06:25 ते रात्री 09:28 पर्यंत
  • महाशिवरात्री व्रत 2024 पराण वेळ- 9 मार्च 2024 रोजी सकाळी 6:37 ते दुपारी 3:28 पर्यंत

महाशिवरात्रीच्या पूजेचे महत्त्व

हिंदू धर्मात महाशिवरात्रीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भोलेनाथ माता पार्वतीसोबत पृथ्वीवर येतात. या दिवशी भगवान शिव आणि गौरी यांची विधिपूर्वक आणि खऱ्या मनाने पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक शुभ फल प्राप्त होतात. या दिवशी काशी, उज्जैन, हरिद्वारसह इतर शिव तीर्थक्षेत्रांवर महाशिवरात्री पूजेची विशेष शोभा असते. प्रत्येक शहरात मोठ्या थाटामाटात शिवाची मिरवणूक काढली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी