Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मकर सक्रांत भरभरून देणार, या चार राशींच्या लोकांचं नशीब घोड्यासारखं धावणार, तयार झालाय दुर्मिळ राजयोग

ग्रहांचा राजा भगवान सूर्य देव यांनी आज मकर राशीत प्रवेश केला आहे. हा राशी प्रवेश चार राशींच्या लोकांना अत्यंत शुभ ठरणार आहे.

मकर सक्रांत भरभरून देणार, या चार राशींच्या लोकांचं नशीब घोड्यासारखं धावणार, तयार झालाय दुर्मिळ राजयोग
HoroscopeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 14, 2025 | 10:00 PM

ग्रहांचा राजा भगवान सूर्य देव यांनी आज मकर राशीत प्रवेश केला आहे. सूर्य देव आता महिनाभर मकर राशीत सक्रमण करणार आहेत.दुसरीकडे ज्याला ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखलं जातं तो मंगळ ग्रह सध्या कर्क राशीमध्ये सक्रमण करत आहे. सूर्य आणि मंगळ यांच्या या राशी स्थानामुळे समसप्तक राजयोग तयार झाला आहे. या ग्रहस्थितीचा परिणाम हा 12 ही राशींवर होणार आहे.मात्र ही ग्रहस्थिती चार राशींना अत्यंत शुभ ठरणार आहे. जाणून घेऊयात या चार राशींबद्दल.

धनु रास

सूर्य आणि मंगळ ग्रहाच्या समसप्तक राजयोगाचा अत्यंत शुभ परिणाम हा धनु राशीवर होणार आहे. धनु राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या नष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत.करिअरमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. नोकरीचे नवे प्रस्ताव येऊ शकतात. जे व्यवसाय करतात, त्यांना देखील व्यवसायात मोठा लाभ मिळू शकतो. आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. थोडा खर्च वाढण्याची शक्यता आहे, मात्र उत्पन्नाचे स्त्रोत देखील वाढणार आहेत.

वृश्चिक रास

सूर्य आणि मंगळ ग्रहाच्या समसप्तक राजयोगाचा वृश्चिक राशीवर देखील मोठा परिणाम होणार आहे.हा योग वृश्चिक राशीसाठी अत्यंत अनुकूल आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांचं नशीब पूर्णपणे साथ देणार आहे. नोकरीमध्ये काही नव्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.सर्वच क्षेत्रात फायदा होऊ शकतो.

कन्या रास

सूर्य आणि मंगळाचा समसप्तक राजयोग कन्या राशीसाठी देखील शुभ असणार आहे. अनेक दिवसांपासून अडलेलं एखाद काम पूर्ण होऊ शकतं.करिअरमध्ये चांगला फायदा होऊ शकतो,मेहनतीचा चांगलं फळ मिळू शकतं.

मिथून रास

सूर्य आणि मंगळाचा समसप्तक राजयोग मिथून राशीला फायदा मिळून देणारा आहे. या राशींना देखील  नोकरीत चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायात देखील फायदा होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार.
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल.
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?.
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्...
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्....
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले.
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल.
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?.
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली.
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा.