मार्च महिन्यात मंगळ गोचर भरणार जातकांची झोळी, चार राशींना सर्वाधिक फायदा

Mangal Gochar 2023: पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात मंगळ ग्रह गोचर करणार आहे. मंगळ ग्रह गोचरामुळे चार राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना फायदा होईल.

मार्च महिन्यात मंगळ गोचर भरणार जातकांची झोळी, चार राशींना सर्वाधिक फायदा
मार्च महिन्यात मंगळाची चाल ठरणार प्रभावी, चार राशींना मिळणार आर्थिक पाठबळ
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 6:01 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहानं एका राशीनं दुसऱ्या राशीत पाऊल टाकलं की टाकलं, घडामोडींना सुरुवात होते. मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह असून तांबड्या रंगामुळे ओळखला जातो. पृथ्वीवासियांना कायमच मंगळाबाबत कुतुहूल राहिलं आहे.मंगळ या शब्दाचा अर्थ हा शुभ असा होतो. मंगळ या ग्रहाला पृथ्वी पुत्र असंही संबोधलं जातं. ज्योतिषशास्त्रात इतर ग्रहांप्रमाणे मंगळाचीही फळं सांगितली आहे. मंगळ ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा काही राशींना जबरदस्त फायदा होतो. आता पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात मंगळ ग्रह गोचर करणार आहे. 13 मार्च 2023 रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे चार राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या चार राशी कोणत्या आहेत.

वृषभ- या राशीतून मिथुन राशीत मंगळ ग्रह गोचर करणार आहे. म्हणजेच वृषभ राशीच्या दुसऱ्या स्थानात हा ग्रह असणार आहे. हे स्थान धनस्थान म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक पाठबळ मिळेल. आई वडिलांचीही चांगली साथ मिळेल. तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या लोकांना विशेष लाभ मिळेल. पण असं असलं तरी गाडी चालवताना विशेष काळजी घ्यावी. तसेच तब्येतीची काळजीही घ्याल.मंगळाची शुभं फळ मिळावी यासाठई मंगळवारी देवी दुर्गेला लाल फूल अर्पण करा.

सिंह- या राशीच्या अकारव्या स्थानात मंगळ ग्रह विराजमान होतील. हे स्थान नोकरीशी निगडीत आहे. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो. पगारवाढीसह जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही नव्या उद्योगधंद्यासाठी प्रयत्नशील असाल तर हा काळ उत्तम राहील. न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. मंगळवारी मारुतिरायाची पूजा करून मिठाई दान करा.

मकर- मंगळ हा ग्रह या राशीच्या सहाव्या स्थानात असणार आहे. त्यामुळे आरोग्य विषयक तक्रारी दूर होतील.स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळेल. कामाच्या निमित्ताने विदेशात जाण्याचा योग जुळून येईल.उत्पन्नात देखील या काळात वाढ होईल. विनाकारण अनावश्यक वादात अडकू नका आणि कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करा. या गोचराचं शुभ मिळण्यासाठी रोज गुळाचं सेवन करा.

मीन- मंगळाचं राशी परिवर्तन या राशीच्या लोकांना फलदायी ठरेल.या काळात नवं वाहन आणि घर खरेदी करण्याचा योग जुळून येईल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. या काळात कौटुंबिक वाद होऊ शकतात. पण प्रेमाने नात्यातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.