AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशी भविष्य 13 June 2024 : त्यांची वणवण थांबेल, तुमचं काय?; आज तुमच्या राशीत काय?

Horoscope Today 13 June 2024 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशी भविष्य 13 June 2024 : त्यांची वणवण थांबेल, तुमचं काय?; आज तुमच्या राशीत काय?
Horoscope Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 13, 2024 | 7:30 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 13 June 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष (Aries Daily Horoscope)

आज आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे. तुम्हाला तुमच्या कामात मोठं यश येणार आहे. कौटुंबिक संबंध चांगले ठेवा. आज तुम्ही नवं काम सुरू कराल. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. विद्यार्थ्यांचं लक्ष त्यांचे मित्र भटकवण्याचं काम करू शकतात. तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा प्लान करणार असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. एखाद्या कामानिमित्त तुम्हाला प्रवास घडू शकतो. तुमच्यासाठी हा प्रवास फायद्याचा होईल.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

आजच्या दिवशी तुम्हाला खर्चाला आवर घालावा लागणार आहे. नशीबाची आज तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. खर्च अधिक असल्याने तुम्हाला आर्थिक ताणतणावाचा सामना करावा लागेल. तुमच्या कामापासून सावधान राहा. तुमचा एखादा सहकारी तुम्हाला त्रास देऊ शकतो. सकारात्मक विचार करा. विदेशातील एखाद्या निकटवर्तीयाचा फोन येईल, चांगली वार्ता ऐकायला मिळेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. तब्येतीच काळजी घ्या.

मिथुन (Gemini Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहणार आहे. आळस टाकून तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. तुमच्या कामात विचारपूर्वक पुढे जा. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका. घरात बरीच कामं निघणार आहेत. त्यामुळे त्रास होईल. मात्र, कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन या समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. इकडे तिकडे बसून वेळ वाया घालवू नका. व्यवसायात तुम्ही एखादी योजना पूर्ण करण्यावर भर द्याल. कुटुंबात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं. या कार्यक्रमात कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त होतील.

कर्क (Cancer Daily Horoscope)

आजचा दिवस तुम्हाला अत्यंत कष्टाचा जाईल. नोकरीतील व्यक्तींना तुमच्या सहकाऱ्याची मदत घ्यावी लागणार आहे. कोर्टकचेरीच्या प्रकरणात निराशजनक माहिती मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यावर भर द्या. समाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना एखादं महत्त्वाचं पद मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. कार्यक्षेत्रात काही मैत्रिणींकडून त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील समस्या दूर होतील. आईच्या एखाद्या गोष्टीचं वाईट वाटू शकतं.

सिंह (Leo Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. जीवनात नवी उंची गाठाल. परंतु चांगल्या कामासाठी काही कष्ट घ्यावे लागतील. ते तुम्हाला भारी पडतील. तुम्ही तुमची दिनचर्येत व्यायाम आणि योगाला सामील करून घ्याल आणि स्वस्थ राहाल. तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतीही संधी तुम्ही हातून घालवू नका. एखाद्या विषयावरून जोडीदारासोबत गैरसमज होईल. जोडीदाराशी बोलल्यास हा प्रश्न मार्गी लागेल. वैयक्तिक आयुष्यात आज यश मिळेल.

कन्या (Virgo Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी चढ उताराचा असेल. तुम्हाला कौटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुमच्या मनात अनेक प्रकारचे विचार येतील, इतरांसमोर हे विचार मांडू नका. एखाद्या गोष्टीमुळे विनाकारण त्रस्त होण्यापेक्षा कुटुंबातील सदस्यांसोबत बसून त्यावर मार्ग काढा. आरोग्याच्याबाबत तुम्ही सावधानता बाळगा. विश्रांती करण्यावर भर द्या, नाही तर शारीरिक कष्ट होतील. कायदेविषयक प्रकरणात अडचणी येतील.

तुळ (Libra Daily Horoscope)

आजच्या दिवशी तुम्हाला अनेक त्रासाला सामोरे जावं लागेल. आज तुम्हाला कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत करावं लागेल. व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आज काही वेळ टाइमपास कराल. कौटुंबिक कामे उद्यावर टाकू नका. राजकारणात कार्यरत असलेल्या लोकांनी विरोधकांकडून सावध राहिलं पाहिजे. नाही तर समस्या वाढेल. पार्टनरशीपमध्ये एखादं काम सुरू करू नका. तुम्हाला तुमच्या मुलांची इच्छा पूर्ण करावी लागेल. घाईत निर्णय घेणे तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी यथातथा राहील. तुम्हाला आज भाग्याची साथ लाभेल. यशाचे नवीन मार्ग उघडतील. एखादी गुप्त माहिती कोणत्याही व्यक्तीला सांगू नका. ती तुमच्यापुरतीच मर्यादित ठेवा. तुमची एखादी महत्त्वाची वस्तू हरवली असेल तर ती तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. घर किंवा दुकान खरेदी करू शकता. आरोग्याशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. नाही तर आरोग्य अधिकच बिघडेल. त्यामुळे तब्येतील जपा. नोकरीची वाट पाहणाऱ्यांना आज एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.

धनु (Sagittarius Daily Horoscope)

तुम्हाला आज तुमचं उत्पन्न वाढवण्यावर भर द्यावा लागेल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात नव्या उंचीवर जाल. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळेल. कारण तुमची आर्थिक स्थिती पूर्वी पेक्षा चांगली राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याची जीवनसाथी शोधण्याची वणवण थांबेल. आज त्यांना त्यांचा मनपसंत जीवनसाथी मिळेल. तुमचं एखादं कायदेशीर प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता आहे. मुलांच्या करिअरमुळे तुम्ही थोडे चिंतित व्हाल. पण ते चांगलं करिअर घडवतील. आज बाहेर फिरायला जाण्याचा प्लानिंग कराल.

मकर (Capricorn Daily Horoscope)

आजच्या दिवशी आरोग्याची काळजी घ्या. त्यासाठी खाण्यापिण्याची पथ्य पाळा. तुम्हाला मुलांचे खर्च मर्यादित ठेवावे लागतील, खर्च वाढवले तर तुम्हाला नंतर अडचणी होतील. आज तुम्ही मित्रांसोबत काही वेळ मौजमस्ती कराल. एखाद्याच्या सांगण्यावरून निर्णय घेऊ नका. कुटुंबातील समस्या डोके वर काढतील. त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. विद्यार्थ्यांना आज बौद्धिक आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळेल.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

आजचा दिवस तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. तुमचा मान सन्मान वाढेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. दीर्घ काळापासूनची तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांचा आज काही नवीन शिकण्याकडे कल असेल. व्यवसायातील किरकोळ लाभांकडेही पाहण्याची गरज आहे. घरी पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. समाजिक क्षेत्रातील लोकांच्या कामाची दखल घेतली जाईल. त्यांना मानमरातब मिळेल.

मीन (Pisces Daily Horoscope)

आजच्या दिवशी नको ती लफडी मागे लागतील. डोक्यावर ताण वाढल्याने तुम्ही त्रस्त व्हाल. या राशीच्या विद्यार्थ्यांनाही आज अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. तरच त्यांना यश मिळेल. कुणाशीही बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवा. नाही तर तुमची प्रतिमा मलिन होईल. नोकरी करणाऱ्यांनी पूर्ण लक्ष कामावर केंद्रीत करावं. राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना आज काही सभांना संबोधित करावं लागेल. कोणत्याही वादात पडू नका. नाही तर कायदेशीर अडचणी उद्बवतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच