Gokul Geete Win in Nashik : नाशिकमध्ये गेम फिरला, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी
Gokul Geete Win in Nashik : नाशिकमध्ये गेम फिरला असून महायुतीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला असून फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याची सूत्रांची माहिती आहे.

विधान परिषद निवडणुकीत सर्वांच लक्ष नाशिकच्या निकालाकडे लागलं होतं. कारण इथे बंडखोरी झाली होती. निकालाच्या दिवशी सुद्धा शेवटपर्यंत टि्वस्ट दिसत होता. अखेर तसच घडलं आहे. नाशिकमध्ये गेम फिरला असून महायुतीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला असून फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याची सूत्रांची माहिती आहे.नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर गोकुळ गीते समर्थकांचा जल्लोष सुरु आहे. गोकुळ गीते यांना 389 मत मिळाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात गीते कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु आहे. हमसे जो टकरायेगा वो मिटी मे मिल जायेगा अशा घोषणा गोकुळ गीते यांच्या समर्थकांकडून दिल्या जात आहेत. नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे अधिकृत उमेदवार होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांवर महायुतीने एकत्र निवडणूक लढवली.
नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली होती. पण या जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटलेले पहायला मिळू शकतात. महायुतीत बेबनाव वाढू शकतो. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना पहिल्या फेरीत मिळाली 357 मतं. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना 248 मतं मिळाली. मोजणी प्रक्रियेत 13 मतं अवैध ठरली. त्यामुळे विजयासाठी 303 चा कोटा ठरलेला. पहिल्या फेरीतच कोटा पूर्ण झाल्याने दुसरी फेरी होणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट.
उदय सामंत स्वत: दोन ते तीनवेळा नाशिकला आले
नाशिकची जागा शिवसेनेला सुटल्यानंतर गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून उदय सामंत आणि भाजपकडून गिरीश महाजन यांनी दोन्ही गीते बंधुंची समजून काढण्यासाठी बरेच प्रयत्न केला. त्यांच्या नाकदुऱ्या काढल्या. उदय सामंत स्वत: दोन ते तीनवेळा नाशिकला आले. गोकुळ गीते यांना भेटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गोकुळ गीतेंना समजावलं. गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवला. पण अखेरीस निकाल गीतेंच्या बाजूने लागला. असा निकाल लागणं महायुतीसाठी चांगले संकेत नाहीत. नाशिकमध्ये भाजपची ताकद जास्त आहे. आजच्या निकालातून ते दिसून आलं. “माझा भाजपशी संबंध नाही. माझे बंधु गणेश गीते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढवू शकतो” असं गोकुळ गीते यांचं म्हणणं होतं.
