नववर्षात शनि शुक्रासह चार ग्रह होणार वक्री, या राशींसाठी असेल सुवर्णकाळ
नववर्ष सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या वर्षात जवळपास सर्वच ग्रह राशीबदल करणार आहेत. यात प्रामुख्याने शनि, राहु आणि केतुचा समावेश आहे. असं असताना काही राशींसाठी चांगले दिवस येणार आहेत.

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवरून भाकीत वर्तवलं जातं. कोणता ग्रह जन्मकुंडलीत कोणत्या स्थानात विराजमान आहे. आता त्या ग्रहाची काय स्थिती आहे, यावरून भविष्यकथन केलं जातं. गोचर कुंडलीत सर्वसमावेशक ग्रहांबाबत भाकीत वर्तवलं जातं. यावरून राशीचक्रावर ग्रहांचा कसा प्रभाव पडणार याबाबत सांगितलं जातं. नववर्ष 2025 मध्ये सर्वच ग्रह राशीबदल करणार आहेत. यात शनि, राहु-केतु यांचाही समावेश आहे. कारण शनिचा अडीच वर्षाचा काळ पुढच्या वर्षी संपुष्टात येत आहे. शनि कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. तर राहु आणि केतु यांचाही दीड वर्षांचा कालावधी पुढच्या वर्षी पूर्ण होत आह. त्यामुळे हे दोन्ही ग्रहदेखील राखीबदल करणार आहेत. त्यात चार ग्रहांची स्थिती वक्री असणार आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. वक्री होणाऱ्या ग्रहांमध्ये बुध, शुक्र, शनि आणि गुरु ग्रहाचा समावेश आहे. ग्रहाच्या वक्री स्थितीचा प्रभाव सर्वच राशींवर पाहायला मिळेल. पण तीन राशींचं नशिब चमकू शकतं. चला जाणून घेऊयात या लकी राशींबाबत
वृश्चिक : या राशीच्या जातकांना चार ग्रहांची वक्री स्थिती लाभदायक ठरणार आहे. यावेळी या राशीच्या व्यक्तींना अकस्मात धनलाभ होऊ शकतो. तसेच काही वेळेआधीच पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नात वाढ झाल्याने काही प्रश्न मार्गी लागतील. अविवाहीत लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. आपल्या बोलण्याने कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या.
मकर : या राशीची पुढच्या वर्षी साडेसातीतून सुटका होणार आहे. त्यात ग्रहांची वक्री स्थिती लाभदायक ठरणार आहे. या काळात नोकरी करणाऱ्या जातकांचं प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट होऊ शकतं. तुमच्या बोलण्यात अधिक गोडवा जाणवेल. उद्योगधंद्याशी निगडीत अनेक प्रश्न मार्गी लागतील. घर खरेदी करण्याचं स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते,
कर्क : या राशीच्या जातकांना 4 ग्रहांची उत्तम साथ लाभेल. आत्मविश्वास वाढेल. तसेच घेतलेले निर्णय योग्य ठरतील. त्यामुळे तुमच्यावरील विश्वास कित्येक पटीने वाढेल. भागीदारीच्या धंद्यात तुमची छाप पडेल. तुमच्यामुळे धंद्याची आर्थिक स्थिती सुधारेल. त्यामुळे तुम्हाला एक वेगळा असा मान असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
