Numerology Today 17, November 2021| सर्वकाही सर्वोत्तम , पण एकाच कमजोरीमुळे आयुष्यात समस्या, जाणून घ्या शुभ अंक 05 असणाऱ्या लोकांचे रहस्य

शुभ अंक 05 चे लोक स्वभावाने अतिशय सर्जनशील आणि मैत्रीपूर्ण असतात, हे लोक आयुष्यात अतिशय लवकर निर्णय घेतात. या अंकाच्या लोकांना सर्वांसोबत राहायला आवडतं. या लोकांच्या आयुष्यात सर्वकाही चांगले चालू असते पण एका कमजोरी त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या वाढवते.

Numerology Today 17, November 2021| सर्वकाही सर्वोत्तम , पण एकाच कमजोरीमुळे आयुष्यात समस्या, जाणून घ्या शुभ अंक 05 असणाऱ्या लोकांचे रहस्य
number-5

मुंबई : ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला तर अशा व्यक्तींचा शुभ अंक 05 असतो. पाचव्या क्रमांकावर बुध ग्रहाचे राज्य असते. ज्योतिष शास्त्रात बुध ग्रह रॉयल समजले जाते. त्यामुळे ही शुभ तारीख असणारे लोक देखील अतिशय रॉयल असतात. शुभ अंक 05 असणारे लोक विचाराने निश्चयी, बुद्धिमान आणि जीवनात सक्रिय असतात. असे लोक नेहमी काही ना काही करत असतात. शुभ अंक 05 लोक उर्जेचा एक उत्तम स्त्रोत असतात. या अंकाची लोक निर्णय घेण्यात माहीर असतात. प्रकरण कितीही मोठं असलं, तरी त्याबाबत लवकर निर्णय घेतात.

शुभ अंक 05 असलेल्या लोकांचा जोडीदार

शुभ अंक 05 असलेले लोक मनमिळावू स्वभावाचे असतात परिणामी त्यांचे बरेच मित्र देखील असतात. मात्र, त्यांचे प्रेमसंबंध कायमस्वरूपी नाहीत. त्यांच्या आयुष्यात दोन लग्ने किंवा एकापेक्षा जास्त नातेसंबंध असण्याची शक्यता आहे. ज्यांचा जन्म 21 मे ते 20 जून किंवा 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान झाला आहे आणि त्यांचा मूलांक पाच आहे, तर अशी व्यक्ती तुमच्यासाठी चांगली जीवनसाथी असू शकते.

शुभ अंक 05ची वैशिष्ट्ये

शुभ अंक 05 लोक अतिशय बुद्धीमान आणि सुंदर मानले जातात. आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर ते प्रत्येक परिस्थिती हाताळतात आणि शेवटी यश मिळवतात. अशी व्यक्ती त्या सर्व कामांमध्ये यशस्वी होऊ शकतात.

शुभ अंक 05ची कमजोरी

शुभ अंक 05ची असलेल्या लोकांमध्ये एकाग्रतेचा अभाव असतो. सहसा, ते त्यांचे सर्व काम घाईघाईने करतात आणि यामुळे अनेक वेळा दुखापत होते. शुभ अंक 05ची ही सर्वात मोठी कमजोरी आहे. अनेक वेळा प्रेमसंबंधातील बदलांमुळे ते स्वतःला खूप एकाकी वाटतात. शुभ अंक 05चे लोक खूप विचार करतात, यामुळे ते अनेकदा त्यांच्या मनात गोंधळलेले असतात.

शुभ अंक 05 असलेल्या लोकांनी ‘या’ देवाची पूजा करा

शुभ अंक 05 असलेल्या लोकांनी बुध ग्रहाची पूजा करावी. या लोकांनी सरस्वती आणि गणपतीची पूजा करणे खूप फलदायी असते. गणपतीच्या पूजेने त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन कीर्ती वाढते.

 

इतर बातम्या : 

Chanakya Niti | हातात पैसा टिकत नाही, देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवायचंय? , तर चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी आत्मसात करा

Kartik Purnima 2021 | कार्तिक पौर्णिमेला 5 गोष्टी नक्की करा, आयुष्यातील सर्व दु:ख दूर होतील

आर्थिक विवंचनेत आहात?, घरी हे 3 फोटो लावा धनलाभ नक्की होईल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI