AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Panchak : नऊ जूनपासून सुरू होणार पंचक, या चुका अवश्य टाळा

हे पाच दिवस पंचक (Panchak in June 2023) म्हणून ओळखले जातात. या महिन्यात 9 जूनपासून पंचक सुरू होणार आहे. शुक्रवारी सुरू होत असल्याने या वेळी पंचकला चोर पंचक म्हटले जाईल.

Panchak : नऊ जूनपासून सुरू होणार पंचक, या चुका अवश्य टाळा
पंचकImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 07, 2023 | 8:32 PM
Share

मुंबई : सनातन धर्मात कोणतेही कार्य करण्यापूर्वी शुभ आणि अशुभ काळाचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात असे पाच दिवस असतात जेव्हा कोणतेही शुभ आणि मंगल कार्य केले जात नाही. हे पाच दिवस पंचक (Panchak in June 2023) म्हणून ओळखले जातात. या महिन्यात 9 जूनपासून पंचक सुरू होणार आहे. शुक्रवारी सुरू होत असल्याने या वेळी पंचकला चोर पंचक म्हटले जाईल. या पंचकात व्यापार किंवा पैशाचे व्यवहार टाळावा. चोर पंचक कधीपासून आहे आणि कोणती कामे करण्यास मनाई आहे ते जाणून घ्या.

पंचक म्हणजे नेमके काय?

ज्योतिषशास्त्रीय गणना आणि सनातन पंचांग नुसार पंचक 5 नक्षत्रांच्या संयोगाने बनते. यामध्ये धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र यांचा समावेश होतो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र पाच दिवसांत दोन राशीतून भ्रमण करतो. या पाच दिवसांमध्ये चंद्रही या पाच नक्षत्रांमधून जातो म्हणून या पाच दिवसांना पंचक म्हणतात. पंचक दर 27 दिवसांनी येते.

पंचक काळ

सनातन पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची षष्टी तिथी म्हणजेच 9 जून 2023 सकाळी 06.02 वाजता सुरू होत आहे, जी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथीला म्हणजेच 13 जून 2023 रोजी दुपारी 1.32 वाजता समाप्त होईल.

हे काम चोर पंचकमध्ये करू नये

  1. या काळात कोणाशी उधारीचे व्यवहार करणे टाळा. म्हणजेच उधार घेऊ नये आणि देऊसुद्धा नये.
  2. पंचक काळात तुमच्या वस्तूंची काळजी घ्या. या काळात चोरीची दाट शक्यता असते.
  3. चोर पंचक दरम्यान कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यास मनाई आहे. या काळात व्यवसाय सुरू केल्यास तोटा होतो.
  4. चोर पंचकमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे टाळा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.