AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अडीच वर्षे शनिदेवांची कशी असेल स्थिती, 12 राशींवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

शनिदेव सध्या कुंभ राशीत अडीच वर्षांसाठी ठाण मांडून आहेत. त्यामुळे इतर ग्रह गोचर करत कुंभ राशीत आले की शुभ अशुभ युतींची सांगड होणार आहे. त्यात शनिदेव अडीच वर्षे कशी फळं देतील जाणून घेऊयात

अडीच वर्षे शनिदेवांची कशी असेल स्थिती, 12 राशींवर काय होणार परिणाम? जाणून घ्या
कुंभ राशीत शनिचं अडीच वर्षे ठाण, तीन राशींना साडेसाती तर दोन राशींवर अडीचकी, जाणून घ्या 12 राशींवरील परिणाम
| Updated on: Apr 04, 2023 | 3:23 PM
Share

मुंबई – ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव राशीचक्रात न्यायदेवतेची भूमिका बजावतात. आपल्या कर्मानुसार शनिदेव फळं देतात. त्यामुळे जातकाला आपल्या राशीत शनिदेव आले की चांगलाच घाम फुटतो. त्यामुळे शनिदेव कोणत्या स्थानात बसले आहेत याचा अंदाज ज्योतिष घेत असतात. कारण शनिदेवांमुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. शनिदेव 17 जानेवारी 2023 रोजी राशी परिवर्तन करून कुंभ राशीत आले आहेत. आता अडीच वर्षे शनिदेव याच राशीत असणार आहेत. त्यामुळ पुढची अडीच वर्षे बारा राशींवर काय परिणाम होईल जाणून घेऊयात.

मेष – या राशीच्या जातकांना अडीच वर्षे तशी चांगली जातील. कारण शनिदेव या राशीच्या अकराव्या स्थानात असणार आहेत. धन आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ उत्तम असेल. काही अडचणी दूर होतील. शनिदेवांची कृपी व्हावी यासाठी अन्नदान करा.

वृषभ – या राशीच्या जातकांवर शनिदेवांची कृपा राहील.या राशीच्या दहाव्या स्थानात शनिदेव विराजमान आहेत. समाजात मान सन्मान वाढेल. शनिदेवांची कृपा व्हावी यासाठई नियमित हनुमानाची उपासना करावी.

मिथुन- या राशीच्या जातकांनी नुकतीच अडीचकीतून सुटका झाली आहे. या राशीच्या नवव्या स्थानात शनिदेव आहेत. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. शनिवारी लोखंडी वस्तूंचं दान करा.

कर्क – या राशीच्या जातक सध्या शनिच्या अडीचकीखाली आहेत. शनिदेव अष्टम स्थानात विराजमान आहेत. अडीच वर्षे तब्येत आणि कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल. नियमितपणे शनिदेवांची उपासना करा.

सिंह – या राशीच्या जातकांच्या सप्तम भावात शनिदेव स्थित आहेत. अविवाहीत लोकांचे विवाह जमतील. कामाच्या ठिकाणी जबाबदारीने काम करा. त्यामुळे भविष्यात फायदा होईल. नित्य हनुमानाची उपासना कराल.

कन्या – या राशीच्या षष्टम स्थानात शनिदेव विराजमान आहेत. या काळात शत्रू पक्षावर मात कराल. करिअर आणि कामाच्या ठिकाणी चांगली फळं मिळतील. शनिवारी अन्नदान कराल.

तूळ – शनिदेवांना तूळ अतिशय प्रिय आहे. त्यात अडीचकीतून नुकतीच सुटका झाली आहे. सध्या शनिदेव पंचम स्थानात आहेत. वैवाहिक जीवन आणि तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. मधल्या बोटात लोखंडी अंगठी परीधान करा.

वृश्चिक – या राशीच्या पंचम स्थानात शनिदेव असून अडीचकी सुरु आहे. शनिदेव चतुर्थ स्थानात आहेत. जीवनात बऱ्याच उलथापालथ होताना दिसतील. दररोज संध्याकाळी शनिदेवांच्या मंत्राचा जाप करा.

धनु – या राशीच्या जातकांची नुकतीच साडेसातीतून सुटका झाली आहे. शनिदेव तृतीय स्थानात आहेत. शनिदेव अडकलेली कामं पूर्ण होतील.काही अडचणी तात्काळ सुटतील. शनिवारी अन्नदान करा.

मकर – शनिदेवाची ही स्वरास असून स्वामी आहे. या राशीला साडेसातीची शेवटची अडीच वर्षे सुरु आहेत. त्यामुळे कौटुंबिक कलह दिसून येईल. वाहन चालवताना काळजी घ्याल. संध्याकाळी शनिदेवांच्या मंत्राचा जप करा.

कुंभ – शनिदेव सध्या याच राशीच अडीच वर्षांसाठी स्थित आहे. तसेच साडेसातीचा मधला टप्पा सुरु आहे. उतरती साडेसाठी सर्वात कठीण असते. त्यामुळे या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. शनिमंत्राचा नित्य जप कराल.

मीन – या राशीच्या बाराव्या स्थानात शनिदेव विराजमान आहेत. साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे शनिचं तुमच्यावर पूर्ण लक्ष असेल. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. मधल्या बोटात लोखंडी अंगठी परिधान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.