AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shukra Gochar 2025: शुक्राच्या दुहेरी संक्रमणामुळे ‘या’ 3 राशींचे होणार मोठे नुकसान, आरोग्यही बिघडू शकते!

Shukra Gochar 2025: एप्रिल महिन्यात शुक्र एक नाही तर दोनदा राशी बदलणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होईल तर काहींना नुकसान होईल. पुढील महिन्यात शुक्राचे भ्रमण केव्हा होईल आणि कोणत्या राशींवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडेल हे जाणून घेऊया.

Shukra Gochar 2025: शुक्राच्या दुहेरी संक्रमणामुळे 'या' 3 राशींचे होणार मोठे नुकसान, आरोग्यही बिघडू शकते!
Shukra GocharImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 17, 2025 | 6:32 PM
Share

समृद्धी, वैवाहिक सुख, विलास, कला, प्रतिभा, कीर्ती, सौंदर्य,वासना आणि फॅशन-डिझाइनिंग इत्यादींचा दाता असलेल्या शुक्राला शास्त्रात विशेष महत्त्व आहे. ठराविक काळानंतर, शुक्र राशी आणि नक्षत्रांमध्ये संक्रमण करतो, ज्याचा सर्व राशींवर खोल प्रभाव पडतो. वैदिक पंचागानुसार, शुक्र पुढील महिन्यात दोनदा आपले नक्षत्र बदलणार आहे. त्यामुळे बहुतेक राशींवर अशुभ प्रभाव पडणार आहे. चला जाणून घेऊया एप्रिलमध्ये शुक्राच्या दुहेरी संक्रमणामुळे कोणत्या तीन राशींचा कठीण काळ सुरु होणार आहे.

एप्रिलमध्ये शुक्राचे संक्रमण कधी होणार?

पंचांगानुसार, 1 एप्रिल 2025 रोजी पहाटे 4:25 वाजता, शुक्र पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल, जिथे तो 26 एप्रिल 2025 पर्यंत राहील. 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 12:02 वाजता शुक्र उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तिथे तो 16 मे 2025 पर्यंत दुपारी 12:59 पर्यंत उपस्थित राहील.

‘या’ राशींवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव

मेष

एप्रिलमध्ये शुक्राचे दुहेरी संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांनी पैशाचे व्यवहार करताना सावध राहा. अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांचे बॉसशी वाद होऊ शकतात. घरामध्ये काही मोठी समस्या निर्माण होईल ज्यामुळे तणावाचे वातावरण असेल. वयोवृद्ध लोकांनी खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष दिले नाही तर त्यांना गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या संभवेल.

कुंभ

एप्रिल महिन्यात शुक्राच्या दुहेरी भ्रमणामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी नुकसान होण्याची शक्यता आहे. एकीकडे नोकरदार लोकांच्या उत्पन्नात घट होईल तर दुसरीकडे व्यापारी वर्ग पैशासाठी तळमळणार आहे. याशिवाय नोकरदार लोकांचे आरोग्यही बिघडू शकते. काही गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांचे पालक त्यांच्या लग्नासाठी जुळणी शोधत आहेत त्यांना या वर्षी चांगली बातमी मिळणार नाही.

मीन

शुक्राच्या दुहेरी चालीचा मीन राशीच्या लोकांच्या जीवनावर अशुभ प्रभाव पडेल. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती ढासळेल. युवक निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च करतील त्यामुळे भविष्यात त्यांना पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागेल. स्वतःच्या वाहनाने ऑफिसला जाणाऱ्या लोकांचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे वाहने चावताना काळजी घ्या. जोडप्यांमध्ये दररोज भांडणे होतील आणि त्यामुळे ते मानसिकरित्या अस्वस्थ राहतील.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.