Shani Dev: EMIचं ओझं वाढतय, यश मिळत नाही? शनीदेव तर नाराज नाहीत? वाचा उपाय
कधीकधी डोक्यावर कर्ज असणे हे शनीदेव नाराज असल्याचे संकेत असतात. शनी देवाची नाराजी कशी दूर करावी चला जाणून घेऊया...

जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल आणि ईएमआयचा भार कमी होण्याऐवजी वाढतच असेल, तर एकदा तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून घ्या. कारण बऱ्याचदा तुमचे सर्व प्रयत्न ग्रहांच्या अडथळ्यामुळे अयशस्वी होतात आणि तुम्हाला याची जाणीवच होत नाही. जेव्हा तुम्हाला याची जाणीव होते, तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
शनिदेव: कलियुगाचे न्यायाधीश, जे प्रत्येक चुकीचा हिशेब ठेवतात. ब्रह्मांड पुराणानुसार, “सर्वग्रहाणांमध्ये न्यायधिपः स्मृतः” म्हणजेच सर्व ग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायाधीश मानलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्मांचा फळ देणारा ग्रह मानलं जातं. हा ग्रह व्यक्तीच्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचं फळ देतो, जसं एखादा न्यायाधीश गुन्ह्याच्या आधारावर शिक्षा किंवा निर्दोषाला दिलासा देतो. त्यामुळे शास्त्रात म्हटलं आहे की, शनिदेव ना पक्षपाती आहेत, ना क्रूर स्वभावाने दंड देतात. ते फक्त कर्मांचं निष्पक्ष मूल्यमापन करतात. बृहत्पाराशर होरा शास्त्र आणि इतर ग्रंथांमध्ये शनिदेवांना दंडाधिपती, कर्मफलदाता आणि न्यायकारी असं संबोधलं गेलं आहे.
शनिदेव नाराज आहेत का? कर्ज आणि नुकसानाचे हे संकेत ओळखा
अचानक कर्ज आणि ईएमआय वाढणं
तुम्ही कितीही प्रयत्न केले, तरी कर्ज संपण्याऐवजी वाढतच आहे? हा शनिदेवांच्या दंडात्मक प्रभावाचा संकेत असू शकतो.
मेहनतीचं फळ न मिळणं
जेव्हा शनिदेव नाराज असतात, तेव्हा व्यक्तीला त्याच्या कर्मांचं पूर्ण फळ मिळत नाही. मेहनत होते, पण बचत किंवा स्थिरता मिळत नाही.
व्यवसायात फसवणूक
कुंडलीत शनि नीच असेल किंवा सप्तम/द्वादश भावात अशुभ असेल, तर व्यवसायात भागीदाराकडून फसवणूक, भागीदारी तुटणे यासारख्या गोष्टी घडू शकतात.
पैशाचा सुख मिळत नाही
पैसे येतात पण लगेच निघून जातात? हा शनिदेवांच्या चोरवत् दृष्टीचा संकेत असू शकतो. जातक पारिजातानुसार, “मंगलो हि गृहं भित्त्वा सौख्यं हरति चौरवत्” म्हणजेच मंगळ ग्रह चोरासारखं सुख चोरतो. शनिदेवही याचप्रमाणे जीवनात फळ देतात.
कोर्ट-कचहरी किंवा कर्ज प्रकरणात अडकणं
शनिदेवांच्या दशेत व्यक्तीला विवाद, कोर्ट केसेस किंवा कर्जाचे वाद सहन करावे लागतात.
कुंडलीशिवाय शनिदेव भयंकर नाराज असल्याचं कसं ओळखावं?
जर तुमच्याकडे अचूक जन्मतारीख किंवा वेळ नसेल, तरी खालील संकेतांवरून तुम्ही शनिदेवांची स्थिती ओळखू शकता:
सतत धनहानी किंवा व्यवहारात फसवणूक
घरात भांडणं किंवा नात्यांमध्ये फूट
उदासीनता, भीती, झोपेची कमतरता किंवा मानसिक थकवा
कालसर्प किंवा पितृदोषासारखा प्रभाव जाणवणं
शनिदेव नाराज असतील तेव्हा काय करावं? तात्काळ सुरू करा हे उपाय
शनिवारी शनि मंदिरात जा
तेल अर्पण करा, शनि चालीसा किंवा “ॐ शं शनैश्चराय नमः” मंत्राचा १०८ वेळा जप करा.
गरिबांची मदत करा
काळे वस्त्र, तीळ, उडीद, जोडे, छत्री इत्यादींचं दान करा.
खोटी प्रतिष्ठा आणि फसवणूक टाळा
शनिदेव दिखाव्याने चिडतात. जे लोक छल-कपट करतात, त्यांना शनिदेवांच्या दशेत मोठं नुकसान सहन करावं लागतं.
कामाप्रती प्रामाणिक राहा
शनिदेव हे कर्मांचा ग्रह आहेत. कर्ममार्गापासून दूर गेल्यास ते दंड देतात, पण शिस्तबद्ध जीवनावर आशीर्वाद देतात.
शास्त्रात शनिदेवांच्या दंडाबद्दल म्हटलं आहे, “शनि यदि कुपितः स्यात्, न देवो रक्षितुं क्षमः” म्हणजेच जर शनिदेव नाराज झाले, तर देवही रक्षा करू शकत नाहीत. शनिदेवांपासून स्वतः भगवान शिवही सुटले नाहीत.
