Astrology: मीन राशीतील मंगळ आणि गुरु यांचा ‘या’ राशींवर प्रभाव; धनलाभाची शक्यता!

ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळ आणि गुरू (Mars and Jupiter) या ग्रहांना अत्यंत महत्त्व असतं. आताच्या ग्रह मनानुसार मंगळ आणि गुरू मीन राशीत बसलेले आहेत. मीन राशीत असलेले मंगळ आणि गुरू काही राशींना फलदायक ठरणार आहेत. मंगळ हा सर्व ग्रहांचा सेनापती आहे, असे म्हणतात. मंगळ हा ऊर्जा, भाऊ, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रमाचा ग्रह आहे, असे म्हटले जाते. […]

Astrology: मीन राशीतील मंगळ आणि गुरु यांचा 'या' राशींवर प्रभाव; धनलाभाची शक्यता!
नितीश गाडगे

|

Jun 25, 2022 | 1:14 PM

ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळ आणि गुरू (Mars and Jupiter) या ग्रहांना अत्यंत महत्त्व असतं. आताच्या ग्रह मनानुसार मंगळ आणि गुरू मीन राशीत बसलेले आहेत. मीन राशीत असलेले मंगळ आणि गुरू काही राशींना फलदायक ठरणार आहेत. मंगळ हा सर्व ग्रहांचा सेनापती आहे, असे म्हणतात. मंगळ हा ऊर्जा, भाऊ, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रमाचा ग्रह आहे, असे म्हटले जाते. मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. तो मकर राशीत उच्च आहे, तर कर्क राशीत दुर्बल आहे. दुसरीकडे, ज्योतिषशास्त्रात, शुक्र हा भौतिक सुख, वैवाहिक सुख, विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रणय यांचा कारक ग्रह आहे. शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे आणि मीन ही त्यांची उच्च चिन्ह आहे, तर कन्या ही त्यांची दुर्बल राशी आहे. मीन आणि वृषभ राशीमध्ये मंगळ व गुरु असल्यामुळे कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होत आहे आणि कोणाच्या नशिबात धनलाभ (Dhanlabh) आहे  हे जाणून घेऊया.

  1. वृषभ- राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. नफा होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचा अनुभव घ्याल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. नोकरी-व्यवसायातही प्रगतीची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.
  2. कर्क- राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ म्हणता येईल. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. हा काळ व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी वरदानापेक्षा कमी नाही. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी काळ शुभ आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल. आरोग्य चांगले राहील. या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभाचे शक्यता आहे.
  3. कुंभ- राशीचा हा काळ नोकरी आणि व्यवसायासाठी वरदानापेक्षा कमी नाही. पैसा आणि नफा मिळेल, त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत राहील. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी काळ चांगला आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल.
  4. मीन- राशीची आर्थिक बाजू मजबूत असेल. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. नोकरी-व्यवसायात लाभ होईल. कामात यश मिळेल. एखादा नवीन व्यवसाय भागीदारीमध्ये सुरु करू शकता.

ज्योतिष या शब्दाचा मूळ स्रोत हा संस्कृत शब्द ज्योति मध्ये आहे. ज्योति म्हणजे प्रकाश देणारी वस्तू. माणसाच्या जन्मवेळेची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष होय. माणसाच्या पत्रिकेतील ग्रह आणि गोचर ग्रह यांच्या अभ्यासावरून परिणाम ठरत असतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें