कोणाला धनलाभ, कोणाच्या वैवाहिक जीवनात आनंद?, जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल

आपल्या राशीतील गृहांच्या दिशेवरुन आजचा दिवस कसा असू शकते, याचं भाकित जोतिशांनी केलं आहे. जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल. (today saturday horoscope all rashi)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:23 AM, 27 Feb 2021
कोणाला धनलाभ, कोणाच्या वैवाहिक जीवनात आनंद?, जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल
राशीभविष्य

 मुंबई : आज शनिवार आहे. हनुमान आणि कालीमातेच्या उपासनेचा दिवस म्हणून शनीवार ओळखला आहे. आपल्या राशीतील गृहांच्या दिशेवरुन आजचा दिवस कसा असू शकतो, याचं भाकित जोतिशांनी केलं आहे. जाणून घेऊया आजचा दिवस कसा जाईल. (today saturday horoscope of all rashi know all details)

मेष

आजचा दिवस मेष राषीसाठी आनंदाचा राहील. आर्थिक दृष्टिकोनातून स्थैर्य़ लाभेल. युवकांना करियरमध्ये नव्या संधी मिळतील. व्यवसायात स्थिरता येईल. तसेच सामाजिक कामात तुमचा पुढाकार वाढेल. समाजातील मान सम्नानामध्येही बऱ्याच प्रमाणात वाढ होईल. आजच्या दिवशी तुमच्या कार्यशैलीत थोडा बदल करण्याची गरज आहे. मेष राशी असणाऱ्यांसाठी आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा असेल.

वृषभ

वृषभ राषी असणाऱ्यांची कौटुंबिक स्थिती आज जेमतेम असेल. सामाजिक जिवनात यश मिळेल. तसेच आज तुमच्या परिसरातील काही स्थळांना भेट देण्याचा योगायोग येऊ शकतो. आजचा दिवस सकारात्मक पद्धतीने जाईल. तसेच, तुमचा मित्रांसोबतचा दिवस चांगला असेल. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. आरोग्यामध्येसुद्धा सुधारणा होईल. दरम्यान आजच्या दिवशी कोणाविषयी अपशब्द बोलू नका. कामासंदर्भात अनेक चांगल्या गोष्टी समोर येतील.

मिथून

एखाद्या ज्ञानी आणि कुषाग्र व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते. आज स्व:तला तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही कामात व्यस्त राहाल. आज बचत योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होऊ शकतो. धार्मिक कार्यात सहभाग नोंदवा. व्यवसायात वृद्धी होईल. कामाच्या ठिकाणी आंनदाची बातमी मिळू शकते.

कर्क

आज कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. एखाद्या नातेवाईकाची भेट होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात. कार्यलयात सहकाऱ्यासोबत वाद होऊ शकतो. आरोग्यासंबंधीचे काही प्रश्न निर्माण होऊ होतील. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात तुमचा रस वाढेल. अनावश्यक खर्च करणे टाळा. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

सिंह

व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. कामात निराशा येऊ शकते. प्रवास करणे टाळा. पती आणि पत्नीसोबत चांगला वेळ घालवता येईल. पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. ऑफिसमध्ये चांगली बातमी मिळेल.

कन्या

आर्थिक स्थिती चांगली असेल. परिवारासोबत नातेवाईकांच्या घरी जाण्याचा योग येईल. वैवाहिक जीवनात माधूर्य येईल. नोकरीमध्ये बदल होऊ शकतो. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. थांबलेले काम पुन्हा नव्याने सुरु होऊ शकते. मोठ्यांच्या अनुभवाचा फायदा होईल.

तुळ

आज एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते. अनावश्यक खर्च करणे टाळावे. प्रवासाचा योग येऊ शकतो. जेवणासंबंधी काळजी घ्या. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून मोठा व्यवहार होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद येणार.

वृश्चिक

व्यापार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नवे व्यवहार होऊ शकतात. धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ शकते. वादविवादास कारण होऊ नका. धार्मिक यात्र चांगली राहील. विद्यार्थ्यांना परिश्रम घेण्याची गरज आहे. मित्रांची मदत होईल.

धनु

अनोळखी लोकांपासून सावध राहावे. शत्रू नुकसान पोहोचवू शकतात. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आरोग्याच्या अडचणी निर्माण होणार नाहीत. ऑफिसमध्ये एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. वयस्क व्यक्तींची काळजी घ्या. गुंतवणुकीच्या धोक्यापासून सावधान राहावे.

मकर

संपत्तीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता. आज परेशानीपासून मुक्तता मिळेल. वयस्कांच्या आरोग्याविषयी सतर्क राहा. नातेवाईकांशी भेट होऊ शकते. विरोधकांपासूनही सावध राहा. प्रॉपर्टीविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. आज एखादी दुखत बातमी येऊ शकते. जुन्या मित्रांशी भेटीचा योगायोग.

कुंभ

आरोग्यासंबंधी काही अडचणी निर्माण होऊ शकतात. आहारासंबंधी बदल करणे गरजेचे आहे. कायदेशीर बाबींमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासासंबंधी अडचणी येऊ शकतात. समजातील मान-सन्मान वाढू शकतो. वाहन चावलताना काळजी घ्या. कार्यालयात सहकाऱ्याची मदत होईल.

मीन

व्यवसायासंबंधी काही समस्या निर्माण होऊ शकतात. कर्जासंबंधी अडचणी येऊ शकतात. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. युवकांनी आपल्या करियरसंबंधी काळजी करवी. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. आजचा दिवस सामान्य असेल. नोकरीमध्ये बढती होऊ शकते.

इतर बातम्या :

Magh Purnima 2021 | माघ पौर्णिमेचे पवित्र व्रत, जाणून घ्या व्रत विधी आणि शुभ मुहूर्त…

(today saturday horoscope of all rashi know all details)