AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 15 जुलै 2023, या राशीच्या लोकांनी वैयक्तिक जीवनात सावध राहावे

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 15 जुलै 2023, या राशीच्या लोकांनी वैयक्तिक जीवनात सावध राहावे
राशी भविष्यImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 15, 2023 | 9:27 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

मेष

आज विचारपूर्वक आणि विवेकाने निर्णय घेतल्यास यश मिळेल. नोकरीत हितशत्रु वरचढ पणा करण्याची शक्यता आहे. व्यापारिक जबाबदारी देणे घेणे सीमीत ठेवा. आर्थिक स्थिती मध्यम राहील. अनिष्ट स्वरूपाचे दिनमान राहील. थकित रक्कम मिळण्यास विलंब होईल. कामकाजात प्रगतीचे योग जुळून येण्यास अडचण जाणवेल. कार्यक्षेत्रात फळ मिळणे कठीण वाटते. व्यापारात नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. वाईट सवयीपासून दूर राहा. उत्तेजित पणावर संयम राखावा.

वृषभ

आज आपल्या कार्यक्षेत्रात प्रतिकूल वातावरण राहिल. मतभेद व वादांना टाळण्याचा प्रयत्न करा. मित्र मैत्रिणींकडून नातेवाईकांकडून आज विशेष सहकार्य लाभणार आहे. आपल्या पराक्रमी वृत्तीमुळे आपल्याकडे येणाऱ्या लोकांच्या अपेक्षा जास्त राहतील. कोणाचाही तिरस्कार करू नका. व्यापार व्यवसाय चांगला राहील. विवाह इच्छूकांचे विवाह जुळतील. प्रेमसंबंधात दृढ विश्वास निर्माण होईल. प्रेमीयुगुलामध्ये स्नेह वाढेल. व्यापारात नवीन योजनाची सुरुवात कराल.

मिथुन

आज अनिष्ट स्वरुपाचा दिवस आहे. रोजगारात ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वासात अनिश्चितता राहील. कामात झालेल्या बदलांमुळे ताण वाढण्याची शक्यता आहे. व्यापार व्यवसायात उतविळ पणामुळे नुकसान होईल. मुलाशी वाद निर्माण होतील. कौंटुबिक वैयक्तिक जीवनात सावध राहा. कामकाजात मनाजोगे समाधान लाभणार नाही. मनावर संयम ठेवा. पत्नीच्या आरोग्याबाबतीत तक्रारी होण्याची शक्यता आहे.

कर्क

आज स्वभावात अस्थिरपणा वाढीस लागेल. चिडचिडपणा व राग उत्पन्न होईल. शांत राहण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. धावपळ व धगधग वाटेल. संयम कमी होऊ शकतो. नातेवाईकांसोबत कलहाचं वातावरण निर्माण होण्याचे प्रसंग उद्‌भवतील. शैक्षणिक कामात अडथळे निर्माण होतील. कुटुंबापासुन कामानिमित्त दुर जावे लागेल. व्यापार-व्यवसायात अनावश्यक खर्च वाढणार आहे. नोकरीत कामाच्या ठिकाणी संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

सिंह

आज उच्च पदप्राप्तीचा योग आहे. नोकरीत धाडसी व घडाडीचे निर्णय घ्याल. यश मिळेल. राजकीय सामाजिक कार्याबद्दल उत्तम दिनमान आहे. पतप्रतिष्ठा वाढेल. आपले प्रयत्न यशस्वी होतील. विचारपूर्वक निर्णय घेतल्याने व्यापार व्यवसायात नफ्यात वाढ होऊन अनपेक्षित लाभ होईल. नवीन व्यापाराची योजना पुर्णत्वास जाईल. भागीदाराची साथ मिळेल. पत्नीकडून उत्तम सहकार्य लाभेल. मुलांच्या प्रगतीमुळे मन समाधानी राहिल. देवा विषयी विश्वास वाढेल.

कन्या

आज केलेल्या कार्यातून प्रसिद्धी मिळेल. अनपेक्षित संघी व लाभ मिळेल. नोकरीत नवीन संधी मिळतील. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ व विस्तार होईल. नोकरीत स्थान बदलाची उत्तम संधी आहे. बढ़ती व प्रमोशनचे योग आहेत. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य लाभेल. व्यापारात नविन योजनाची सुरुवात होऊ शकते. जुनी येणी वसुल होतील. उत्पनाचे स्तोत्र वाढतील. शासकीय रखडलेली कामे मार्गी लागतील. वाईट संगती व सवयीपासुन मात्र दुर राहा.

तुला

काहीसा संमिश्र फल देणारा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी गैरसमज वाढतील. उत्पनातून मन समाधानी राहणार नाही. सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल. व्यावसायिकांनी मोठे व्यवहार टाळावेत. खरेदीविक्रीचे व्यवहार करू नये. काही मनस्तापासारख्या घटना घडतील. ताणतणाव जाणवेल. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल. मुलांना आरोग्याच्या तक्रारी उद्भभवू शकतात.

वृश्चिक

आज रोजगारात वरिष्ठांकडून साथीदाराकडून मदत मिळेल. घरामध्ये छोट्या समारंभाच्या निमित्ताने प्रियजनांची गाठभेट होईल. व्यापारात कार्यक्षेत्र वाढ होईल. आपली कार्यकुशलता व इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. शासकीय सेवेत कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे. जोडीदाराच्या व संततीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. राजकिय व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल.

धनु

आज मानसन्मान मिळेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण कराल. रोजगारात वरिष्ठांकडून प्रशंसा मिळवाल. कामातली प्रगती पाहून समाधान व्यक्त कराल. संततीच्या दृष्टीने येणाऱ्या शुभवार्ता अभिमानास्पद ठरतील. व्यापारात दिनमान उत्तम आहे. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. आप्तेष्ट नातेवाईकांशी असलेले संबंध मर्यादित ठेवा. विचाराधीन असलेली कामे पार पडतील. मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

मकर

आज कौटुंबिक समस्या दूर होतील. मात्र विलासी भोगी वृत्तीत वाढ होईल. मानसिक अस्थिरतेचा परिमाण रोजगारात जाणवेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कटुता निर्माण होईल असे वागणे टाळावे. अंहकारीवृत्तीला आळा घाला. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. व्यापारात आपले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीच्या प्रकरणात गुंतले जाण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचे आहे.

कुंभ

आज स्वताःचा निर्णयावर ठाम रहा. स्थावर मालमलेची खरेदी विक्री संभव आहे. सामाजिक कार्यात  आपले योगदान राहिल. व्यापारिक निर्णयात मात्र गोपनीयता बाळगा. रोजगारात दिनमान उत्तम आहे. आर्थिक योजनावर चर्चा व्यापार-व्यवसाय चांगला चालेल. इतरांना न जमणारी कामे तुम्ही यशस्वीरित्या हाताळाल. त्यामुळे वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहिल. कार्यक्षेत्रात नवीन कामाच्या योजनेमुळे फायदा होईल.

मीन

आज शुभ दिवस असेल. रोजगारात महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी अनुकुल दिवस राहिल. श्रमापेक्षा अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. सहनशीलता कमी होऊ देऊ नका. व्यापारात नवीन योजनावर कार्य सुरु होईल. नातेवाईकांबदल विचारात बदल होईल. मनाचा दाखविलेला मोठेपणा नातेसंबंधातील तेढ कमी करणारा ठरेल. मोठ्या व्यक्तींच्या सहकार्याने रोजगारात फायदा होईल. आपल्या अंगीभूत असणाऱ्या कलागुणांना वाव मिळेल.जोडीदार नोकरीत असेल तर वेतनवाढ योग आहेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.