AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 25 मार्च 2023, या राशीच्या लोकांचे आर्थिक स्त्रोत वाढेल

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 25 मार्च 2023, या राशीच्या लोकांचे आर्थिक स्त्रोत वाढेल
आजचे राशी भविष्यImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 25, 2023 | 12:05 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे भविष्य

मेष

नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. अनपेक्षित आर्थिक लाभही संभवतो. मात्र, अतिआत्मविश्वास आणि अतिउत्साहीपणा टाळावा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. पत्नी साथीदारांच्या कामावर लक्ष असू द्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. पत्नीशी कुटुंबातील इतर सदस्यांसी मनमुटाव होण्याची शक्यता आहे. मनोबल मानसिक स्वास्थ सांभाळा.

वृषभ

कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. शासकीय सेवेत नियमबाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भभवतील. कुटुंबापासून विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल. दुसऱ्यावर अतिविश्वास ठेवू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्या. आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींना साधनेसाठी अनुकुल दिवस आहे.

मिथुन

आज चांगली फले मिळतील. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. यश मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. जुन्या परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत कला गुणासाठी चांगले वातावरण राहील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. संतसाहित्य आध्यात्मीक स्वरुपाचे लेखन होईल. संततीची काळजी घ्या. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका.

कर्क

सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. नोकरी परिश्रमाचा पूर्ण मोबादला मिळेल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. प्रगतिकारक दिवस आहे. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. काहींना प्रमोशन व वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल.

सिंह

राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दूरचा प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. एखादी महत्वाची पण विलंबाने झालेली कृती फायद्याची जाणवेल. निरनिराळ्या सूचना कल्पना रोजगारात व्यावसायिकदृष्ट्या आमलात आणा. भाग्यदायक दिनमान राहील.

कन्या

अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. कामचुकारपणा करू नका. मागील स्मृती उजाळल्याने दुखः होऊ शकते. शक्यतो प्रवास टाळा.अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे.

तुला

व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकांना मात करू शकाल. दुसर्‍याला जामीन राहू नका. अन्यथा फसवणूक किंवा आर्थिकहानी होण्याची शक्यता आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. विरोधक आक्रमक होतील त्यांचा वेळीच बिमोड कराल तर यशस्वी व्हाल. पत्नीकडून सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक

शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी, समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. व्यसनी मित्रांपासून दूर राहा. आपल्या विरोधात काहुर उठेल. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी. घरातील वातावरण बिघणार नाही, याकडे लक्ष द्यावे. सावधानीपूर्वक वाटचाल करावी.

धनु

नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. अनावश्यक चिंतेपासून दूर राहा. देणे-घेणे सावधानता बाळगा. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होतील. व्यापार-व्यवसायात दिवस फायदेशीर राहील. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. व्यापारात नविन योजना आखाल त्या फायदेशीर ठरतील. घरगुती वातावरण चांगले राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. कौटुंबिक जीवन सुखी राहील.

मकर

सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल.घरासंबंधी समस्या दूर होतील.आपल्या हातून विशेष काम होण्याचे योग आहेत. व्यापारात साथीदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. शारिरिक कामात वाढ करण्यासाठी प्रयत्न करा. काही विशेष कामानिमित्त आपणास लांबच्या प्रवासाचे बेत आखावे लागतील. आर्थिकबाबतीत फायद्याचे दिनमान आहे. व्यापारात गुंतवणुक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल. धनसंचयात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाचा संधी मिळेल. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. समाजकारणात प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ

कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखकवर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती मिळेल. कर्तुत्व सिद्ध करू शकाल. हातून विधायक कार्य घडेल. अतिरिक्त कामानुन उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई करू नका. दूरच्या प्रवासातून आर्थिक लाभ होतील. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील.

मीन

आज व्यवहार चातुर्य आणि संयमी भूमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होणार आहे. योग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. जोशपूर्वक कामात रस घ्याल. विद्वान लोक भेटतील. कौटुंबिक समाधान लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.