AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 8 जुलै 2023, या राशीच्या लोकांच्या उत्पन्नत वाढ होईल

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 8 जुलै 2023, या राशीच्या लोकांच्या उत्पन्नत वाढ होईल
राशी भविष्यImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 08, 2023 | 9:22 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

मेष

आज आपणास गतकाळातील केलेल्या कार्यातून आकस्मिकरित्या धनलाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. वादविवाद संपुष्टात येतील. नोकरीत मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. देवधर्म व अध्यात्म याविषयावर आस्था वाढेल. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून आर्थिक लाभाची शक्यता आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. शारिरिक स्वास्थ बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृषभ

आज आपल्या महत्वकांक्षेनुसार सर्व घडेल. दुसऱ्याच्या विश्वासाला सार्थ ठराल. हाती घेतलेली कामे योजना पूर्ण कराल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. बौद्धिक अडचणी दूर होतील. रोजगारात सहकार्य व चांगले संबंध यामुळे आर्थिक लाभ होतील. अनेक दिवसापासून अडकलेले काम पुर्णत्वाकडे जातील. घरात आप्तेष्ट व नातेवाईकाचे आगमन होईल. शुभ संदेश मिळतील. शास्त्रीय अभ्यास संशोधनपर विषयाच्या प्रारंभास उत्तम आहे.

मिथुन

आज भाग्योदयकारक दिनमान आहे. नोकरीत कामात यश मिळेल. मनोबल वाढेल. कुंटुबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल. समृद्धी लाभेल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. आध्यात्मिक कार्य घडेल. दुरवरच्या प्रवासातुन लाभ होतील. शासकीय कामात शुभ दिवस आहे. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वाटचाल करा.

कर्क

आज कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. कुटुंबातील सदस्यांची चिंता वाटेल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताणतणात्मक राहिल. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. शत्रुपक्ष वरचढ राहिल. आपल्या कामात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील. मुलांच्या भविष्याची काळजी राहिल.

सिंह

आज वादविवाद होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत विवाद टाळावा. वैवाहिक जीवनात कटुना निर्माण होईल. कलह व राग उत्पन्न करणारा दिवस आहे. रोजगारात अतिरिक्त ताणतणाव पूर्ण दिवस राहणार आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. शक्यतो आज प्रवास टाळावा. वाहनापासून काळजी घ्या. प्रकृतीची काळजी घ्या.

कन्या

आज कामात व्यस्त राहाल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. कोणाचाही द्वेष तिरस्कार करू नका. शत्रुपक्षावर वर्चस्व वाढेल. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागेल. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यात वाढ होईल. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा वाढेल. नातलगासोबतचे वाद मिटतील. कौटुंबिक पातळीवर परिवाराची साथ मिळाल्याने समाधानी राहाल.

तुला

आज रोजगारात आपले प्रयत्न सफल होतील. व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. मात्र अतिउत्साहीपणे धाडसी कामे तूर्तास टाळा. राजकीय सामाजिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. नोकरीत नवीन संकल्पना मांडाल.

वृश्चिक

आज कष्टाचे  फळ मिळेल. मनात उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. रोजगारात आर्थिक लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात रुची वाढेल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत प्रयत्नवादी रहा. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामजस्य राहिल.मोठेपणाची अंहकार वृत्ती मात्र टाळा. कामकाजामध्ये वाढ होवुन अनुकुल स्थिती राहणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा.

धनु

आज शुभ दिवस असणार आहे. कला साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना यश लाभेल. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. स्थावर मालमत्तेत फायदा मिळेल. दुसऱ्याची निंदानालस्ती करू नका. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. घरात सुखशाती आनंददायक वातावरण राहिल. आपल्या कार्याचा विचार होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मकर

आज आर्थिक परिस्थिती चांगली राहिल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. रोजगारात नवीन योजना हाती घ्याल. व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील.आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल.

कुंभ

आज आपला प्रभाव वाढल्याने शत्रू पराजीत होतील. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. वाचनाची गोडी वाढणार आहे. मितभाषी रहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. परमेश्वराविषयी विश्वास वाढणार आहे. व्यापारात अनुकुल अशी सफलता मिळेल. वातावरण चांगले राहिल. नोकरीत आपल्या मनातील इच्छेनुसार कामे पूर्ण होतील. आपले विरोधक देखील आपल्या कामाची प्रशंसा करतील. मन लावून काम केल्यास आपल्या कामात वाढ होईल.

मीन

आज व्यक्तीगत जीवनातील चिंता दूर होतील. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहिल. रोजगारात नवीन योजना राबवाल. श्रमापेक्षा अधिक लाभ होतील. व्यवसायात आर्थिक लाभ वाढणार आहे. उत्पन्नात वाढ होईल. नवीन संधी मिळतील कौटुंबिक सुख-शांती मिळेल. आनंददायी घटना घडतील. नवीन व्यक्तींशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्तावित होतील. दिवसभर मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढीस लागेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....