Vastu Tips : स्वयंपाक घरात असतील या वस्तू तर लक्ष्मी होते नाराज, आजच करा बाहेर
हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात (VastuShastra) घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये अशा काही(Vastu Tips) गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वापरून तुम्ही घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता.

मुंबई : वास्तुशास्त्र हे हिंदू व्यवस्थेतील सर्वात प्राचीन शास्त्रांपैकी एक आहे. वास्तुशास्त्रात (Vastu Tips) दिशांना खूप महत्त्व आहे. कुटुंबाच्या सुखासाठी या शास्त्रात अनेक नियम सांगण्यात आले आहेत. स्वयंपाकघराबाबतही असे काही नियम देण्यात आले आहेत. याची काळजी न घेतल्यास त्या व्यक्तीला आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया स्वयंपाक घराशी संबंधीत काही नियम आणि उपाय.
स्वयंपाकघरात अशी भांडी ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, तुटलेली किंवा तडे गेलेली भांडी चुकूनही आपल्या स्वयंपाकघरात ठेवू नयेत. तुटलेली भांडी वापरून तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.
या वस्तू घरात ठेवण्यास मनाई आहे
घरात प्रथमोपचार पेटी असावी पण ती स्वयंपाकघरात ठेवण्यास मनाई आहे. तसेच, तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात कधीही आरसा लावू नये. असे केल्याने कुटुंबात भांडणे होण्याची शक्यता वाढते.
या सवयीने लक्ष्मी होते नाराज
आपल्या स्वयंपाकघरात नेहमी उपयुक्त वस्तू ठेवा. तसेच स्वयंपाकघरात टाकाऊ वस्तू किंवा कचरा साचणार नाही याची काळजी घ्यावी. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी खरकटी भांडी सिंकमध्ये ठेवू नयेत. असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते.
अशा गोष्टी ताबडतोब काढून टाका
खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ताबडतोब किचनमधून फेकून द्याव्यात किंवा त्या दुरुस्त कराव्यात. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की अशा गोष्टींचा परिणाम मुलांच्या करिअरवर होतो. तुमच्या स्वयंपाकघरातही या गोष्टी असतील तर आजच बाहेर काढा.
वास्तूदोष असल्यास अवश्य करा हे उपाय
- वास्तूनुसार तुमचे स्वयंपाकघर योग्य दिशेला नसेल तर स्वयंपाकघराच्या आग्नेय दिशेला लाल बल्ब लावा आणि तो नेहमी जळू द्या. असे मानले जाते की यामुळे वास्तु दोषांचा प्रभाव कमी होईल.
- स्वयंपाकघरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी स्वयंपाकघरातील भिंती हलक्या केशरी रंगात रंगवा. यामुळे शुभता वाढेल. यासोबतच सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल.
- अनेकजण स्वयंपाकघरात सजावटीसाठी काळ्या दगडाची स्थापना करून घेतात, जे वास्तुनुसार अशुभ मानले जाते. काळा रंग स्वयंपाकघरात नकारात्मकता आणतो. अशा वेळी दगड न फोडता येथे स्वस्तिक बनवा, दुष्परिणाम कमी होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
